Breaking News

विसापूरमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई टाळण्यासाठी तात्काळ नियोजनाची मागणी

विसापूरमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई टाळण्यासाठी तात्काळ नियोजनाची मागणी

भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. संदीप भाऊ पोडे यांची ग्रामपंचायत कार्यालय कडे मागणी

माहा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:-विसापूर गावात येणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तात्काळ पूर्वनियोजन करावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामसेवकांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पुढील काही महिन्यांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गावातील काही भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवली होती. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने आताच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पोडे यांनी सांगितले. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, विहिरी व बोअरवेलची तपासणी व दुरुस्ती करणे, टँकरची आवश्यकता भासल्यास त्याची व्यवस्था ठेवणे तसेच जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले असून या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या तात्काळ सोडववी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत