Breaking News

राजुरा तालुक्यात डिजिटल मीडियाला नवी दिशा;

राजुरा तालुक्यात डिजिटल मीडियाला नवी दिशा;
संतोष मेश्राम तालुका अध्यक्ष तर राकेश कलेगुरवार सचिवपदी नियुक्त.

महाघडामोडी न्युज नेटवर्क, लोकेश पारखी 
राजुरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चंद्रपूर यांच्या वतीने डिजिटल माध्यमातील संघटनात्मक कार्य अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने दि. १४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार संतोष मेश्राम यांची डिजिटल मीडिया राजुरा तालुका अध्यक्ष म्हणून तर राकेश कलेगुरवार यांची डिजिटल मीडिया सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.


     ही नियुक्ती डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात यांच्या हस्ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. नियुक्तीनंतर संतोष मेश्राम व राकेश कलेगुरवार यांनी संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्याचा, पत्रकारांच्या प्रश्नांना डिजिटल माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा आणि संघटनेची ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
   या बैठकीस राजुरा तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे यांच्यासह कार्याध्यक्ष ओंकार आस्वले, उपाध्यक्ष सतीश शिंदे, सहसचिव लोकेश पारखी, प्रसिद्धी प्रमुख अनिल गांपावार, कैलास कार्लेकर, सागर मुत्यालवार तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राजुरा तालुक्यात डिजिटल पत्रकारितेला नवे बळ मिळणार असून पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत