माणिकगड सिमेंटमुळे परिसरात वाढलेलं भीषण प्रदूषण
"दुःखण नाकाला, पट्टी पायाला, प्रदुषणात जिव टांगणीला"
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : राजुरा विधानसभा क्षेत्रातील पहिल्या वाहिल्या गडचांदुरुस्थीत माणिकगड सिमेंट 1981 82 वर्षात गडचांदूर गावालगत उभारण्यात आला व्यापार रोजगार या आशेतूननागरिकांनी मातीमोल भावात आपल्या जमिनी कंपनीला दिल्या मात्र रोजगाराच्या संधी स्थानिकाऐवजीपरप्रांतीच्या कल्याणकारी ठरले माल वाहू वाहनापासून कामगार ते पंचर बनवण्यापर्यंत सर्व कामे स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना देण्यात कंपनीने कसर सोडला नाही.
गेल्या दोन दशकात कंपनीचा विस्तार होतास या ठिकाणी दुसऱ्या प्रकल्पाची उभारणी झाली लोकांना पहिल्यांदा ॲटोमॅटिक प्लांट आहे प्रदूषण होणार नाही यामुळे वातावरण बदल यावर कोणताच परिणाम होणार नाही म्हणून सुरुवात करण्यात आली मात्र गेल्या दोन दशकात पर्यावरण नियम धाब्यावर ठेवून कंपनीने वायू प्रदूषण धुळीचे प्रदूषण यामुळे हक्क गाव वैतागला एवढेच नव्हे तर अनंत असे आजाराने किडनी हार्ट अटॅक बीपी शुगर अशा अनेक आजाराने लोकांच्या घरात शिरून आरोग्यावर व शरीराची काळजी घेण्यासाठी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक करण्याचं काम माणिकगड सिमेंट कंपनीच्या विस्तारातून उदयास आला.
गावातील अनेक नागरिक गेल्या वीस वर्षापासून त्रस्त असताना या भागातील गोपालपूर थुट्रा गडचांदूर येथील शेती पिकेउध्वस्त झाल्या शेतामध्ये धुळीचे थर साचल्याने काळ्यामातीचा रंग भंगरा पांढरा झाला उत्पादन घटल्या मुळे बळीराजा कर्जाच्या खाईत लोटले जात आहे प्रशासन जनतेची हाक ऐकत नाही लोकप्रतिनिधि विकासाच्या दृष्टीने थापा देतात मात्र शहराचा प्रदूषणा प्रश्न सुटता सुटत नाही यामुळे आक्रोश निर्माण झाला जिल्ह्याचे झुंजार नेते जिल्ह्यातील प्रदुषणावर अ ख्व विधान सभा डोक्यावर घेत प्रदुषणाच्या विदारक चित्र सभागुहात उभ करूण अख्या राज्याचे लक्ष वेधून गंभीर जिल्हयाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले व मंत्री पंकजा मुंडेनी मी स्वताः भेट देऊन पाहणी करणार हे शब्द दौऱ्या निमित्याने पार पाडले.
गडचादूर वासियांनी मोठी आशा होती आमच्या भावना ताई ऐकणार व शहाराची दुर्गंधी आरोग्याचा परिणाम दुषित पाण्याचे विकार नागरीकावर असलेले मानीकणड कंपनीचा घोंगावणारा आवाज दुर्गंधी वायू चा परिणाम व तिसरा प्रकल्प नको म्हणण्याची पाळी नागरीकावर आली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यवाही ला न जुमणारा मुजोर अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापन अनेक वेळा बँक गॅरटी जप्त होऊन सुद्धा लोकाच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.
लोकप्रतिनिधि मोठ्या जोरात आम्ही जनते सोबत आहो अशी वल्गना करतात मात्र दौरा गडचांदूर चा बैठक उपरवाहीत यामुळे नागरीकाच्या मना भ्रम निर्माण झाला गोपालपूर येथिल आदिवासी च्या छतावर टिन असताना घरावर धुळीचे आच्छादन दिसतात सौर उर्जा पॅनल वर धुळीचे थर बसल्याने ते सुद्धा उपयोगी नाही कंपनीच्या चौफेर अन्यायाने नागरीकात तिव्र असंतोष फोफावत आहे आदिवासी कुटूंबांचा १५ वर्षाच्या संघर्षानंतर टोकेचे पाऊल व विष प्रशान महसुल अधिकाऱ्यांच्या दालनात घडते हे प्रशासनाच्या नाकर्तेपणाच झलक आहे यामुळे मंत्री आले गावात तर आम्ही आमचे दुःख सांगू मात्र याला बगल देऊन उपरवाही ला सभा घेणे म्हणजे दाल मे कुच्छ काला तो नही अशी वेळ गडचांदूर प्रदूषण त्रस्त संघर्ष समिती ची स्थापना ज्या उद्देशाने झाली व गाव एकवटला असे असताना घुमजाव मुळे नागरीकांच्या तोंडाला पाने पुसण्याची नामुष्की झाल्याची चर्चा शहरात पसरली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत