Breaking News

वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे पाणी प्रश्नासाठी महिला चढली टॉवरवर

मनसेच्या पुढाकाराने महिलां धडकल्या उपविभागीय कार्यालयावर, प्रशासनाने घेतली दखल.

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील वरोरा येथील बेलगावच्या पाणी प्रश्नाला घेऊन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष बाळू गेडाम व शहर उपाध्यक्ष संदीप धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले, दरम्यान उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलक महिला मनसे पदाधिकारी यांची चर्चा सुरु असतांना कुसुम देवानंद वैद्य या महिला या परिसरातील टॉवरवर चढल्या आणि एकच खळबळ उडाली, तब्बल एक तास त्या टॉवरवर चढून होत्या तर प्रशासन हतबल झालं होतं, या अभिनव आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी यांनी आपल्याला लेखी आश्वासन देतो असे जाहीर केल्याने महिला टॉवरवरून खाली उतरली आणि कंपनी व्यवस्थापनाला घेऊन पोलीस स्टेशनं येथे पुन्हा एक बैठक ठाणेदार सोनटक्के यांनी लावून सनफ्लॅग कंपनीचे व्यवस्थापक यांना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशीत केले.

 बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सनफ्लॅग कोल अँड आयर्ण कंपनीच्या भूमिगत कोळसा खाणीमुळे या परिसरातील जमिनीत भुजल पातळी खाली गेल्याने या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या तर बोरवेला सुद्धा पाणी लागतं नसल्याने व कंपनीने दिलेला आरो प्लांट बंद झाल्याने या गावात भीषण पाणी टंचाई सुरु आहे, दरम्यान गावातील सरपंच व इतर राजकीय पुढारी हे यावर कुठलीही उपाययोजना करण्याचे सोडून स्वतःचा स्वार्थ साधत असल्यामुळे गावातील शेकडो महिलांनी एल्गार पुकारला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने मागील शुक्रवार दिनांक 8 मे ला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आणि सोमवार पर्यंत कंपनी व्यवस्थापनाने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन येणाऱ्या दोन महिन्यात कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने मनसे आयोजिय आंदोलनाची सांगता करण्यात आली.

बातमी संकलन : खेमचंद नेरकर, वरोरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत