Breaking News

तिवसा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश वाहतूक रोखली, ८ जनावरांची सुटका

 तिवसा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश वाहतूक रोखली, ८ जनावरांची सुटका

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, तिवसा : अवैध गोवंश वाहतुकीच्या विरोधात तिवसा पोलिसांनी धडक मोहीम राबवत एका मोठ्या कारवाईला यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ गोवंश जनावरांची सुटका केली असून, ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईदरम्यान एकूण १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका वाहनाद्वारे गोवंशाची अवैध पद्धतीने वाहतूक केली जात होती. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद वाहनाला अडवले. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये अत्यंत निर्दयीपणे ८ जनावरांना डांबून ठेवल्याचे आढळून आले. 

 पोलिसांनी या कारवाईत जनावरांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन आणि इतर साहित्य असा एकूण १५,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षितरीत्या नजीकच्या गोरक्षणशाळेत हलवण्यात आले आहे. 

अवैध गोवंश तस्करी आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही कडकपणे राबवण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत