Breaking News

भारी पोलीस स्टेशनचे 'ते' तीन पोलीस कर्मचारी कोण? जिवती तालुक्यात चर्चेला उधाण

अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी होत असल्याच्या चर्चांमुळे खळबळ; ठाणेदारांना याची माहिती आहे का, असा प्रश्न उपस्थित

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती तालुक्यातील भारी पोलीस स्टेशन हद्दीत काही पोलीस कर्मचारी अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी करीत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. या चर्चांमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा उल्लेख होत असल्याचा दावा केला जात असला, तरी या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या कथित प्रकाराबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना माहिती आहे की नाही, याबाबतही नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. जर अशा स्वरूपाच्या तक्रारी किंवा आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलीस विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे या चर्चांमागील सत्य समोर आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वरील बाबी स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चा व आरोपांवर आधारित आहेत. संबंधित व्यक्तींवर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. अधिकृत चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत