Breaking News

अल्ट्राटेक कंपनीच्या व्यवस्थापनाची मुजोरी कोलाम आदिवासीच्या शेतातील कापसाचे पीक केले उद्ध्वस्त

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाची मुजोरी कोलाम आदिवासीच्या शेतातील कापसाचे पीक केले उद्ध्वस्त कारवाईची मागणी

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर :  माणिकगड सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराने खुलेआम कोलाम आदिवासीचे शोषण होत असून,  प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून कंपनीविरुद्ध कारवाई न करता साध्या-भोळ्या आदिवासी कोलामावरच पोलीस गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केल्या जात आहे. सिमेंट कंपनीच्या आठ ते दहा सुरक्षारक्षक व काही अधिकारी यांनी जेसीबी व भाड्याचे ट्रॅक्टर लावून दि २ जुलै २०२६ ला दु. १ वाजता दरम्यान महसुल विभागाच्या सर्व्हे नं. ७ व १२ मध्ये गेल्या ४० वर्षापासून शेती करत असलेल्या जमिनितिल कापूस व तुरीचे वापलेले पिक रामुच्या कुटूंबांतील सुन सुंदरा पत्नी सोनु बाई या पकडून ठेवित लाठी हातात घेऊन सुरक्षा रक्षक यांनी रोखून धरले, जेसिबीने खड्डे करून पेरणी केलेले कापूस, तुर, पिकावर ट्रक्टर फिरविले या मला व कुटूंबाला धमकी दिली.

 येथून हटा ही कंपनीची जागा आहे हात पाय तोडायचे असेल तर या अशी धमकी धक्का बुक्की करुण १० एकर जमिनी वरील पिक नष्ट केलेे. कंपनीला वडिलाचे सर्व्हे नं. ४ /२ व ४ / ३ ची ६ हेक्टर ४८ आर जमीन १९७९ मध्येच दिली व या जमिनीवर कंपनीचा कब्जा असल्याचे दि ९ सप्टे २०२५ च्या कंपनीने घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त ( MOM ) मध्ये प्रमुख चर्चा व निर्णय नुसार ४० वर्षापूर्वी कंपनीचा अखंड वापर व नियंत्रण असल्याचे समझौता करारात नमूद असताना नियमबाहय जमीन हडपण्याचा कंपनीचा डाव होता. 

कंपनी यापूर्वीच अनेक खाजगी शेतकऱ्याच्या जमीनी बळकाऊन अतिक्रमण केले आहे. मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर कंपनीचा ताबा असून नियमाप्रमाणे गेल्या ४० वर्षात कंपनीने भुमापन मोजणी नकाशा दुरुस्त केला नाही, किवा नियमाप्रमाणे कमी जास्त पत्रक तयार केले नसताना एप्रील २०२६ मध्ये लिंगनडोह क्षेत्रातील सर्वे न ७ - १२ - १३ या जमीनीवर अतिक्रमण करुण तारेचे कुंपण सिमेंट खांब गाडल्याची तक्रार तहसिलंदार जिवती यांना दिली आहे साधी मौका चौकशी पंचनामा करण्याची गरज महसुल अधिकाऱ्याना वाटली नाही.

 महसुल विभाग कंपनीचे पाप लपविण्यासाठी वेळोवेळी न्यायलय विधान सभा व वरिष्ठ कार्यालयाची दिशाभुल करत असल्याने आदिवासी ना विष घेण्याची नामुष्की ओढवली आहे वाढता असंतोष व प्रशासनाची चुप्पी कारणीभूत असल्याचा आरोप आदिवासी नी केला आहे तातडीने पोलीस विभागाने रामु च्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा व कोलामावर सतत होत असलेला छळ थांबविण्यात यावा नोकारी लिंगनडोह रसत्या वरील अनाधिकृत गेट खुले करुण सार्वजनिक रस्त्यावर्राल अतिक्रमण हटविण्यात यावे बाम्बेझरी येथिल सव्हे न ४७ व ४८ मध्ये नियमबाह्य शेती उद्धवस्त करुण तयार केलेला रस्ता बंद करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेश सचिव आबिद अली यांनी केली आहे रामु सिडाम यांनी माझे उभे पिक नष्ट करणाऱ्यावर कार्यवाही करुण अटक करावी अन्यथा कुदूंबासह ९ जुलै ला गडचांदूर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत