नांदा फाटा येथील सांस्कृतिक भवन बनले मोकाट जनावरांचे आश्रयस्थान
नांदा फाटा येथील सांस्कृतिक भवन बनले मोकाट जनावरांचे आश्रयस्थान; लाखो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची दुर्दशा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील सर्वात समृद्ध ग्रामपंचायतींपैकी एक म्ह अल्ट्राटेक कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत गोरगरीब नागरिकांना कमी दरात कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध व्हावे, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. मात्र सध्या या भवनात गायी, वासरे, कुत्रे यांचा मुक्त वावर असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. णून ओळखल्या जाणाऱ्या नांदा ग्रामपंचायतीच्या मालकीचे नांदा फाटा येथील सांस्कृतिक भवन आज अत्यंत दयनीय अवस्थेत असून, ते मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनल्याचे चित्र समोर आले आहे.
अल्ट्राटेक कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत गोरगरीब नागरिकांना कमी दरात कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध व्हावे, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. मात्र सध्या या भवनात गायी, वासरे, कुत्रे यांचा मुक्त वावर असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याच परिसरातील शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्लांटचीही अवस्था बिकट झाली असून, देखभालीअभावी सार्वजनिक सुविधांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी हे सांस्कृतिक भवन ग्रामपंचायतीने लिलावाद्वारे एका खाजगी व्यावसायिकाला चालविण्यास दिले होते. मात्र जास्त भाडेदर आणि अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित व्यावसायिकाने सभागृहाचा ताबा सोडल्याची चर्चा परिसरात आहे. त्यानंतर या भवनाची योग्य देखभाल न झाल्याने आज त्याची दुर्दशा झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली ही मालमत्ता पुन्हा स्वच्छ करून, योग्य देखभाल करत सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.जनतेचा सवाल असा आहे की, लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या सार्वजनिक सुविधांची अशी दुर्दशा होणार असेल, तर विकासकामांचा खरा उद्देश काय? आता नांदा ग्रामपंचायत प्रशासन यावर किती लवकर आणि प्रभावी कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत