Breaking News

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली (वन)ची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली (वन)ची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनुर्ली (वन) येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा, पालकांचा आणि गावाचा गौरव वाढविला आहे. या परीक्षेसाठी शाळेतील एकूण २७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २२ विद्यार्थी पात्र ठरले असून ८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून विशेष यश मिळविले आहे.

या यशाबद्दल मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका हिरादेवे मॅडम यांनी सांगितले की, "हे यश विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे, पालकांनी शाळेवर दाखविलेल्या विश्वासाचे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे."

यावेळी त्यांनी शाळेतील शिक्षक विजय राऊत, मेनका मुंडे, सुनील अलोने, भास्कर मडावी आणि नरेश तोडासे यांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. विलास देवाळकर साहेब आणि गटशिक्षणाधिकारी मा. कल्याण जोगदंड साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे तसेच शाळा व्यवस्थापनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत