जिव्हाळ्याच्या कार्यकर्त्याच्या भेटीसाठी आमदार देवराव भोंगळे थेट वडसा येथे;
राजकीय व्यस्ततेतून वेळ काढत जपला आपुलकीचा धागा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, कोरपना : राजकारणात अनेक नेते मोठमोठ्या सभा, दौरे आणि बैठकींमध्ये व्यस्त असतात. मात्र आपल्या कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेतेच खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात स्थान निर्माण करतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला तो राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे वडसा येथील सदिच्छा व पारिवारिक भेटीदरम्यान.
कोरपना भाजपाचे शहर महामंत्री अबरार अली हे मागील काही दिवसांपासून बाहेरगावी असल्याने त्यांची आणि आमदार देवराव भोंगळे यांची भेट होऊ शकली नव्हती. आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यकर्त्याची भेट राहू नये, या भावनेतून आमदार भोंगळे यांनी आपल्या अत्यंत व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत थेट वडसा येथे अबरार अली यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा व पारिवारिक भेट दिली.
या भेटीदरम्यान आमदार भोंगळे यांनी अबरार अली व त्यांच्या कुटुंबीयांची आत्मीयतेने विचारपूस केली. कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या कुशलक्षेमाची चौकशी केली. यावेळी कोणताही औपचारिकपणा न ठेवता अत्यंत आपुलकीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यांच्या या भेटीमुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
राजकारणात कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असतात, ही भावना जपत आमदार देवराव भोंगळे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवतात. मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याशी स्नेहाचे नाते टिकवून ठेवण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घेत असल्याचे या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाले.
अबरार अली यांची पत्नी ही वडसा येथे शिक्षिका असल्याने सध्या ते पण आपल्या पत्नी सोबत असल्याचे आमदार भोंगळे यांना कळले, कोणताही राजकीय अथवा कोणता कार्यक्रम असताना सुद्धा थेट वडसा येथे आपल्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी उपस्थित झाले.
आमदार देवराव भोंगळे यांनी दिलेल्या या अनपेक्षित पण आत्मीय भेटीबद्दल अबरार अली पत्नी अश्फिया . मुलगा राहिश अली त्यांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. "नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते विश्वास, आपुलकी आणि स्नेहावर उभे असते," याचा प्रत्यय या भेटीतून आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
राजकीय व्यस्ततेतून वेळ काढून आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याची व कुटुंबीयांची भेट घेणारे आमदार देवराव भोंगळे यांच्या या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कार्यकर्त्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची पुन्हा एकदा प्रचिती नागरिकांना आली आहे. यावेळी अमोल आसेकर. आशिष ताजणे. सतीश बेतावर. अनिल देरकर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत