परीक्षा फी मधुन शिक्षणाधिकाऱ्याला लाच ?
परीक्षा फी मधुन शिक्षणाधिकाऱ्याला लाच ?
श्रीपतराव हायस्कूलमधील प्रकार, शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाई कडे लक्ष
भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा भारतीय विद्यार्थी मोर्चाची मागणी..!
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) सातारा : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता करंजेपेठ येथील अनुदानित असलेल्या श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर पणे परीक्षा फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून गोळा केलेल्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे.परीक्षा फी च्या माध्यमातून गोळा केलेल्या रकमेतुन शालेय पोषण आहाराचे दप्तर तपासणीच्या नावाखाली सातारा पंचायत समितीमधील शिक्षणाधिकाऱ्याला 5 हजार रुपयांची भेट देण्याचे कारण काय ? असा संतप्त सवाल पालकांच्यामधुन आणि शिक्षणप्रेमींम धुन विचारला जात आहे.मुख्याध्यापकांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर परीक्षा फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून गोळा केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेच्या गैरप्रकारचा कळस झाला असुन या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर संबधिंतावर कोणती कारवाई याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,करंजेपेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानित शाळा आहे.1969 पासून समाजातील सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना या ठिकाणी शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने स्थापन केलेली असुन अलीकडच्या काळात शिक्षण संस्थेच्या परवानगीने या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक करून परीक्षा फी च्या नावाखाली लाखो रुपये गोळा करून शाळा व शिक्षण संस्था वेगवेगळ्या मार्गाने त्याचा उपभोग घेत असल्याचे दिसून येत आहे.हि बाब अत्यंत गंभीर असून परीक्षा फीच्या नावाखाली गोळा केलेली सर्व रक्कम मुख्याध्यापक व शिक्षण संस्थेने स्वतः च्या लाभासाठी उपभोगली असुन आजही त्याचा उपभोग घेणे चालू आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर पणे परीक्षा फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून गोळा केलेल्या लाखो रुपयांचा मोठ्या प्रमाणात अपहार केलेला दिसुन येत आहे.यामध्ये शालेय पोषण आहाराचे दप्तर तपासणीच्या नावाखाली लाच देण्याबरोबरच संस्थेच्या सभेच्या वेळी संस्था पदाधिकाऱ्यांना जेवणावळी,शाळा व संस्था यांच्या ऑफिस मधील खर्च, वीज बील, ऑडिट फी (मानधन),फोनबिल,शाळा व संस्थेतर्फे करण्यात आलेले जाहिरात फलक, ऑफिस व शाळा यांचे मानधन, शाळेतील शिपाई कर्मचाऱ्यांचे मानधन इत्यादी कारणासाठी वापरण्यात आली आहे.
त्यामुळे मुख्याध्यापकांनी शुल्क विनिमय 2011 व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था विनिमय अधिनियम 2016 च्या उपकलम 1,2 व 3 नुसार नियमावलीचा भंग केलेला असुन बेकायदेशीर रित्या गोळा केलेल्या परीक्षा फीचा वापर गैरकामासाठी करुन नफेखोरी केल्याचे दिसून येत आहे.कलम 14 व 15 नुसार लेखे व अभिलेख ठेवणे बंधनकारक असतानाही भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्था प्रमुखांनी लेखे,अभिलेखे, आणि नोंदवह्या जतन करून त्यांची तपासणी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून करून घेतलेली नाही.त्यामुळे शुल्क विनिमय 2011 व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनिमय अधिनियम 2016 नुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कोणती व कधी कारवाई करणार ? याकडे पालकांचू आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
विद्यार्थ्यांच्या कडून शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीर लाखो रुपये गोळा करून भ्रष्टाचार करणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेला विकलांग बनिवण्यासारखं आहे.सातारा मध्ये घडलेली गोष्ट निंदनीय व गंभीर असून सदर प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे घेतलेले शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे.तसेच पुन्हा असा प्रकार होणार नाही त्यासाठी जिल्हास्तरावर पारदर्शक यंत्रणा राबवावी.
भारतीय विद्यार्थी मोर्चा,किरण कांबळे,प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य


कोणत्याही टिप्पण्या नाहीत