Breaking News

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा जनसंवाद कार्यक्रम सुसंपन्न

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा जनसंवाद कार्यक्रम सुसंपन्न

   


(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा विस्तार हा 8 राज्यात असून विदर्भातील प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर कार्यकारिणी गठीत झाल्या आहे.पत्रकारांमध्ये सुसंवाद साधल्या जावा तसेच लोकांपर्यंत पत्रकारांची भूमिका व कार्य तसेच ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी तथा विशेष कलेतून आपल्या जीवनाला यशाचा आकार देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सत्कार व सन्मान करण्यासाठी अ.भ.ग्रा.पत्रकार संघाचे वतीने पूर्व विदर्भ अध्यक्ष रवींद्र तिराणीक यांचे पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथे 8 जानेवारी ला माळरानात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           देशाची सुरुवात गावापासून सुरू होते.लोकशाही मोठी असून लोकशाहीत नागरिक हा प्रथम दर्जाचा आहे.आज आंधळे,बहिरे,मुके अशी परिस्थिती निर्माण झाली असून स्पष्ट बोलणारे नाही.समाजात स्पष्ट बोलणाऱ्यांची उणीव आहे.लोकप्रतिनिधी हे जनतेचे दिवाणजी आहे.नागरिक हा प्रथम आहे त्यानंतर लोकप्रतिनिधी आहे हि जागृती लोकांमध्ये झाली पाहिजे.असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात रामभाऊजी आखरे यांनी जनसंवाद कार्यक्रमात केले.

    जनसंवाद कार्यक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रदीप नागपूरकर,अध्यक्षस्थानी रामभाऊ आखरे तर प्रमुख पाहुणे प्रा.पंकज इटकेलवार,नरेंद्रजी बाळे, गोविंद मित्र,पर्यावरणवादी प्रणाली चिकटे,चोरगाव सरपंचा निरुपाली मेश्राम,माधवराव जीवतोडे,राजू गोरडे,गोपी मित्रा,राशिता शेख,अल्का पचारे,रजनी मेश्राम,प्रदीप कोहपरे यांची उपस्थिती होती.

  कार्यक्रमाचे सुरवातीला अनाथांची आई -माई सिंधुताई सपकाळ यांना श्रदांजली वाहण्यात आली. नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

    पर्यावरणवादी प्रणाली चिकटे यांनी माझा सायकल प्रवास हा जंगलाच्या प्रश्नांच्या शोधात आहे.पर्यावरण वाढत असून माणसांवर त्याचा परिणाम होत आहे.जीवनशैली भोगवादी झाली आहे.पर्यावरण हि समस्या असून त्याचा शोध मी आपल्या प्रवासात घेत आहे.ग्लोबल वार्मिंग जागतिक आवाहन आहे.असे प्रतिपादन पर्यावरणाचा ऱ्हास वाचविण्यासाठी सायकल प्रवास करीत असलेल्या प्रणाली चिकटे ने केले आहे.

   कार्यक्रमाचे उदघाटक प्रदीप नागपूरकर यांनी उदघाटनपर मार्गदर्शनात रुक्मिणी हि विदर्भाची ,सीतेचा जन्म विदर्भातला,माणसांना मोठे व्हायचे असेल तर स्त्रियांची मदत पाहिजे.प्रघात विचार करण्याची शक्ती महिलांमध्ये आहे.कोणातही मी पणा नको,अनुभवातून माणूस मोठा होत असून प्रश्नांचे उत्तर शोधायचे असेल तर उत्तर उत्तर सहज मिळते.तसेच आपल्या पत्रकारिता अनुभवातून अनेक किस्से प्रदीप नागपूरकर यांनी उलगडले.

    आदि उपस्थित मान्यवरांनी आपापले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमात कला,पत्रकार,शेती क्षेत्रातून जीवन घडविणारे व समाजाला प्रेरणा देणाऱ्या कुटुंबाचे व प्रेरणादायी व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात आला.तसेच राम आखरे यांच्या प्रखर लिखित पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष रवींद्र तिराणीक यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत