लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 23 हून अधिक जखमी
लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 23 हून अधिक जखमी
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) औरंगाबाद : औरंगाबादहून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. वैजापूरजवळ दोन आयशरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 23 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी तीन जणांची नावं- कविता आबासाहेब वडमोर (वय वर्ष 45), प्रज्ञा गौतम गायकवाड (वय वर्ष 17), मोनू दिपक वावहळे (वय वर्ष 8)
मृत पाच जणांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. जखमींना औरंगाबाद आणि नाशिक येथे हलवण्यात आलं आहे. पहाटे तीनच्या सुमारास शिवराई फाटा येथे हा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात लग्न लावून हे वऱ्हाडी नाशिकला जात होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत