Breaking News

instagram reel वर शिवीगाळ करणाऱ्या 'लेडी डॉन'ला पोलिसांनी शिकवला धडा!

 instagram reel वर शिवीगाळ करणाऱ्या 'लेडी डॉन'ला पोलिसांनी शिकवला धडा!

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे : सोशल मीडियावर लाईक आणि शेअरसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. पिंपरी चिंचवडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर  50 हजार लाईक मिळावे म्हणून शिवीगाळ करणाऱ्या एका लेडी डॉन म्हणून मिरवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी चांगलीच अद्दल शिकवली आहे. या तरुणीसह तिच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी महाले असं या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंम घोषित लेडी डॉन म्हणून वावरत  होती. या तरुणीने इंस्टाग्रामावर आपल्या 50 हजार लाईक मिळावे म्हणून नको ते उद्योग केले होते. एवढंच नाहीतर 302 अर्थात खून करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासह तिच्या इतर साथीदाराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

साक्षी आणि कुणाल कांबळे त्याच बरोबर त्यांचे इतर मित्र इन्स्टाग्रामवर  "थेरगाव क्वीन" नावाच्या प्रोफाइल वरून नागरिकांना धमकवण्याचे आणि अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरून इंस्टाग्रामवर रील बनवत होते. या प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्यामुळे या टोळक्याविरोधात तक्रारी वाढल्याने पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आणि या सर्वांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले.

त्याच बरोबर सोशल मीडियाचा वापर करताना केवळ लाईक्स मिळाव्यात म्हणून कुणीही असं बेकायदेशीर कृत्य करत असल्यास त्यांच्या विरुद्धही कायदेशीर कारवाई केला जाईल असा इशाराही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत