पुण्यातील जुन्नर रोडवर भरधाव स्कार्पिओवरील चालकाचा ताबा सुटल्याने धडकली झाडाला अन...
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे ; मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे नारायणगाव जुन्नर रोडवर औटी मळा येथे स्काॅर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. नाशिकहून ओझरकडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने स्कार्पिओ गाडी भरघाव वेगाने बाभळीच्या झाडाला धडकली आहे. यामध्ये प्रवास करणाऱ्यांनी मद्यप्राशान केल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून आणखी तीन जणांची स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात एवढा भीषण होता की धडकेत दोन बाभळी मुळासकट जमीन दोस्त झाल्या आहेत.
नारायणगाव जुन्नर रोडवर औटी मळा येथे स्काॅर्पिओ गाडी येत असताना हा अपघात घडला. या वाहनातील नागरिकांनी मद्यप्राशन केलेले असल्यामुळं त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं भीषण अपघाताची घटना घडली. अपघातादरम्यान सुदैवाने एअर बॅग उघडल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.मात्र दोघेजण गंभीरजखमी झाले. या घटनेत स्कार्पिओ झाडावर आदळल्याने दोन झाडे मुळासकट उपटून पडली, विद्युत खांबही तुटले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महावितरणचे अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी , क्रेनच्या सहाय्याने गाडीला बाजुला करुन वाहतुक सुरळित करण्याचे काम सुरु आहे. या भीषण अपघाताच्या निमित्ताने सदर ठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण व स्थानिक जमिन बाधितांना मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकर्यांच्यावतीने करण्यात येत आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत