Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून आचरण करणे काळाची गरज उमाकांत ढेंगे यांचे प्रतिपादन

 छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून आचरण करणे काळाची गरज उमाकांत ढेंगे यांचे प्रतिपादन

संतोष रोकडे, अर्जुनी-मोर : सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रक टला हातात घेउनी तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात शिवाजी राजा होऊ नि गेला जय शिवराय असे थोर शिवाजी महाराज आपल्या भारतात पूजनीय आहेत त्यांचे विचार आचार वर्तन हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी वंदनीय आहेत त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही त्यांच्या विचारांचा अंगिकार करून प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती उमाकांत ढेंगे यांनी केले ते ईटखेडा येथील बाजार चौकात दिनांक 19 फेब्रुवारीला जगदंब सामाजिक संघटना यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यातील चित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोंदिया जिल्हा परिषद माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती उमाकांत ढेंगे तर उद्घाटक म्हणून माजी सरपंच इंद्र दास झिलपे तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अश्विन कोडापे सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष सुभाष देशमुख माजी प्राचार्य एल पी बोळणे माजी प्राचार्य वाय टि चांदेवार पत्रकार संतोष रोकडे देवराम कोरडे कैलास कावळे  मंगेश चव्हाण पूर्णचंद्र धोटे अर्जुन कोरचे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार संतोष रोकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच माजी प्राचार्य यादव चांदेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर कार्यावर प्रकाशझोत टाकून अखंड भारतात असा जाणता राजा महाराष्ट्राने दिला त्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर अनेक गड किल्ले ताब्यात घेऊन गनिमी काव्याने औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला धूळ चारली त्यांचे विचार अंगीकार करून आचरण करावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष वलय चव्हाण उपाध्यक्ष नितेश भोयर सचिव आनंद डोंगरे संदीप कुमरे मिथुन भोयर परमानंद दोनाडकर मिलिंद येरणे किशोर मडावी कुणाल लांडगे समीर पुराम तुषार हटवार हिमांशू हटवार गौरव देशमुख शुभम लोणारे राकेश गबने अविनाश नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत