पोलिओच्या चुकीच्या डोसची बळी ठरली 2 महिन्यांची चिमुकली, मृत्यूनंतर गावात हळहळ
पोलिओच्या चुकीच्या डोसची बळी ठरली 2 महिन्यांची चिमुकली, मृत्यूनंतर गावात हळहळ
महा घडामोडी न्यूज नेटवर्क वाशिम : पोलिओचा चुकीचा डोस दिल्यामुळे दोन महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगरूळपीर तालुक्यातील निंबी येथे घडली. दरम्यान श्रुष्टी आडे या बाळाला 8 फेब्रुवारी पोलिओचा डोस दिला. त्यानंतर श्रुष्टीचा मेंदू काम करत करत नव्हता. तिचा मेंदू बंद झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल केलं. मात्र 15 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिओचा डोस घेण्याआधी श्रुष्टीची तब्येत ठणठणीत होती. पोलिओचा डोस देण्याआधी चार इंजेक्शन दिले आणि नंतर पोलिओचा डोस दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत बाळाचे वडील केशव आडे यांनी संबंधित नर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तसंच आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महिला नर्स आणि सहयोगी डॉक्टर विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार आरोग्य विभागाकडे केली आहे.
या संदर्भात डॉक्टरांना विचारले असता पोलिओचा डोस हा सरकारच्या नियमानुसार दिला जातो. श्रुष्टीला पोलिओचा डोस 8 फेब्रुवारीला गावात देण्यात आला. तिच्यासोबत इतर ही मुलांना हा डोस दिला. मात्र दुसऱ्या मुलांना काहीच इन्फेक्शन झाले नाही. त्यामुळं हा मृत्यू पोलिओचा डोस झाला नसावा असे जिल्हा साथरोग आणि माता बालसंगोपन अधिकारी डॉ मोबिन खान यांनी सांगितलं आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत