Breaking News

बेपत्ता मुलीचा तिसऱ्या दिवशी मृतदेह पाहून संपूर्ण गावात खळबळ

येनापुर गावातील विहिरीमध्ये आढळला 14 वर्षीय  मुलीचा मृतदेह 

 सलग तीन दिवसापासून  गावांमध्ये सुरू होती चर्चा 


चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या  येनापुर  गावातील हा प्रकार, तीन दिवसापासून मुलगी प्रेमसंबंध असलेल्या मुलासोबत पळाली,असा ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले होते, पण आज तिचा  मृतदेह विहरित सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त्त असे की, सुजाता (तनु)  जनार्धन गोंगले असे त्या मुलीचे नाव असून बेघर कॉलनी मधिल तिचा रहवासी आहे, माहिती वरुन ती इयत्ता आठवी ला गावातच शिक्षण घेत होती, तीन दिवसाआधी सुजाता कुणालाही काही न सांगता बेपत्ता झाली होती ,त्यामुळे गावात ती एखाद्या मुलासोबत पळाली आशी चर्चा होती,आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान लक्ष्मण राऊत यांच्या विहरीत सुजाता गोंगले ईचा मृतदेह पाहून गावात खळबळ उडाली आहे. मृतदेह विहिरीचा बाहेर काढला नसून, बातमी लीहेपर्यंत पंचनाम्यासाठी पोलीस अजूनही घटनास्थळी पोहोचले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत