कवयित्री रंजना ब्राम्हणकर 'माय मराठी' पुरस्काराने सन्मानित
कवयित्री रंजना ब्राम्हणकर 'माय मराठी' पुरस्काराने सन्मानित
संतोष रोकडे, गोंदिया : बहुउद्देशिय हायस्कूल अर्जुनी/ मोर जि.गोंदिया येथील शिक्षिका, कवयित्री रंजना ब्राम्हणकर यांना जागतिक मराठी भाषा दिनी दि. २७ फेब्रुवारी रोजी पँराडाईज इंग्लिश स्कूल, सौंदड जि गोंदिया येथे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 'माय मराठी २०२२' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विं वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनी सौंदड येथे मराठी भाषा गौरव दिन सोहळा नागपूरच्या मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केला होता. संस्थेचे संपादक अध्यक्ष राहुल पाटील सविता पाटील यांनी संपादित केलेल्या 'माय मराठी' प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या प्रकाशनानंतर निमंत्रित कवी कवयित्रींच्या संमेलनात सौ.रंजना ब्राम्हणकर यांनी 'निसर्ग देवता कोपली' ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना मुख्य परीक्षक व ज्येष्ठ कवयित्री वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर यांच्या हस्ते माय मराठी पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप मोदी प्रमुख अतिथी अभिनेत्री प्राजक्ता , राजू नवनागे, प्रभाकर दहिकर मुन्ना नंदागवळी संतोष राऊत, किशोर बनसोड केवलचंद शहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवयित्री मुख्य परीक्षक वैशाली अंड्रस्कर यांनी केले तर आभार प्रा तारका रूखमोडे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत