चायनीज मांजाने घेतला पुन्हा एका विद्यार्थिनेचा जीव, वणी शहरातील घटना
चायनीज मांजाने घेतला पुन्हा एका विद्यार्थिनेचा जीव, वणी शहरातील घटना
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) यवतमाळ : ही घटना आहे वणी शहरातील. जैन लेआऊट येथील विद्यार्थिनी सराव परीक्षा देण्यासाठी घरून निघाली. सकाळी आठच्या सुमारात तिने अॅक्टिव्हा गाडी घेतली. एका मैत्रिणीला घेऊन शाळेत सराव परीक्षेसाठी जात होती. आवारी लेआऊटमधील मनोहर मुके यांच्या घराजवळ डांबर रोड आहे. त्याठिकाणी अचानक पतंगीचा मांजा विद्यार्थिनीच्या गळ्यात लटकला. चायनीज मांजा असल्यानं तिचा गळा कापला गेला. यात जखमी झालेल्या तनुश्री विलास पारखीला वणीच्या सुगम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तनुश्रीच्या गळ्याला दहा टाके मारण्यात आले. यावरून पतंगीचा मांजा किती धारधार होता हे जखमेवरुन लक्षात येते.
बंदी असताना विक्री कशी
या चायनीज मांजावर शहरात बंदी आहे. तरीही शहरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांजाची विक्री होत आहे. ही गंभीर बाब आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मांजा कंपनीतून दुकानात येतो. दुकानातून चिल्लर विक्री केला जातो. अशावेळी प्रशासन काय करते, असा सवाल विचारला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत