Breaking News

एनएचएम महाडीपी लिक्वीड युनिट मुळे आरोग्य धोक्यात

एनएचएम महाडीपी लिक्वीड युनिट मुळे आरोग्य धोक्यात

ग्रामपंचायत सदस्य लता शेंडे यांचा आरोप 

तालुका व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार



महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : शेतजमिनीत शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग लावण्याकरिता शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असल्या तरी त्यास तिलांजली देण्यात आल्याचा प्रकार कनेरी/दगडी , तालुका लाखनी येथे उघडकीस आला आहे. एनएचएम महाडीपी लिक्वीड युनिट मधून निघणाऱ्या धुराने आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचा ग्रामपंचायत सदस्या लता रामा शेंडे यांनी आरोप केला असून तालुका व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार अर्ज केला आहे. 

          कृषी विभाग लाखनी अंतर्गत कनेरी/दगडी येथे रुपेश नागलवाडे यांनी एनएचएम महाडीपी लिक्वीड युनिट सुरू केले आहे. यात शिट्रोनेला/लेमन ह्या गवतापासून सुगंधित तेल काढण्याचे प्राथमिक प्रक्रिया केंद्र आहे. सदर युनिट गावालगत असल्याने युनिट सुरू असताना यातून निघणाऱ्या धूर व गवताचे बारीक कनांपासून प्रदूषणयुक्त वातावरण तयार होऊन आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचा तक्रार अर्ज जिल्हाधिकारी भंडारा , तहसीलदार लाखनी , तालुका कृषी अधिकारी लाखनी , तालुका आरोग्य अधिकारी लाखनी तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भंडारा यांना केला होता. युनिट चालकास वारंवार सूचना देऊनही ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसून प्रदूषणाची विल्हेवाट लावण्यास तयार नाही. तथा प्रशासनही यावर समर्पक तोडगा काढण्यास तयार नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य लता शेंडे यांचे म्हणणे आहे. 

          युनिट(प्रक्रिया केंद्र) सुरू करतांना शेतजमीन अकृषिक केली गेली नाही. तथा संबंधित विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य लता शेंडे यांनी केला आहे. एनएचएम महाडीपी लिक्वीड मुळे तयार होणाऱ्या समस्येवर पूर्णकालिक तोडगा न निघाल्यास मला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल. यात माझे जीवाचे काही बरेवाईट झाल्यास किंवा शांतता सूव्यवस्थेस धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असे ग्रामपंचायत सदस्य लता रामा शेंडे कनेरी/दगडी यांनी सांगितले. 

अशी आहे कायद्यात तरतूद
शेत मालावर प्रक्रिया उद्योग अथवा युनिट काढतांना शेतजमीन अकृषिक करण्याची आवश्यकता नाही. तसेच युनिट काढण्यासाठी संबंधित विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राचीही गरज नाही. अशी कायद्यात तरतूद आहे. 

लता शेंडे ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रशासनाकडे एनएचएम महाडीपी लिक्वीड युनिट बाबद तक्रार केली होती. तक्रारीचे अनुषंगाने तहसीलदार लाखनी यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक व अर्जदार गैरअर्जदार यांना पाचारण करून जे निर्देश दिले. त्याप्रमाणे निर्देशाची पूर्तता करण्यात आली. त्यानंतरही काही त्रुट्या राहिल्या असल्यास पूर्तता करण्यास मी तयार आहे. 
रुपेश नरहरी नागलवाडे 
युनिट संचालक कनेरी/दगडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत