सोशल फोरम तर्फे नवनिर्वाचित जि. प. सदस्यांचा सत्कार
सोशल फोरम तर्फे नवनिर्वाचित जि. प. सदस्यांचा सत्कार
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम, भंडारा, लाखनी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र जिल्हा शाखा भंडारा चे वतीने बुद्ध विहार वैशाली नगर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सत्कार समारंभ तथा जिल्हा कार्यकारिणी विस्तारित कार्यक्रम नुकताच पार पडला. सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे सुचनेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजाचे निर्वाचित जिल्हा परिषद सदस्याच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष स्थानी प्रदेशअध्यक्ष जयप्रकाश भवसागर , प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक व कवी अमृत बनसोड , दलीत मित्र म. दा. भोवते , सामाजिक कार्यकर्ता महादेव मेश्राम , म. वा. दहीवले , वामनराव मेश्राम , जिल्हाध्यक्ष अरुण गोंडाणे , कार्याध्यक्ष अरुण जांगळे , जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
साकोली तालुक्यातील वडद जिल्हा परिषद क्षेत्राचे नवनिर्वाचित जि. प. सदस्य मदन रामटेके तथा परसोडी जि. प. क्षेत्राचे सदस्या शीतल राऊत यांचा शॉल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्य सचिव पदी आशित बागडे आणि विस्तारित जिल्हा कार्यकारिणीत ज्योती सुनिल टेंभूर्णे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष , अरविंद धारगावे जिल्हा उपाध्यक्ष , विनीतकुमार देशपांडे , जिल्हा सचिव डॉ. प्रवीण थलकर , जिल्हा कोषाध्यक्ष , दिलीप चौरे , जिल्हा सहसचिव विश्वजित थुलकर , भंडारा तालुकाध्यक्ष सुनील टेंभूर्णे , भंडारा तालुका महासचिव नंदकुमार मेश्राम , मोहाडी तालुकाध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कैलास गेडाम प्रास्ताविक रमेश जांगळे तर आभार अरुण गोंडाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रसिद्धी प्रमुख कालिदास खोब्रागडे , लाखनी तालुकाध्यक्ष अरवींद रामटेके , साकोली तालुका ओबीसी आघाडी उपाध्यक्ष अरविंद कठाणे , सामाजिक कार्यकर्ता अंबादास नागदेवे , सत्यवान मेश्राम , विद्यार्थी आघाडीचे साहिल खोब्रागडे , विजय साखरे , नागसेन कोचे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात बहुसंख्येने जिल्ह्यातील सोशल फोरम चे कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत