Breaking News

अर्थसंकल्पात विदर्भाची अपेक्षा - आ.डॉ.परिणय फुके

अर्थसंकल्पात विदर्भाची अपेक्षा - आ.डॉ.परिणय फुके 



महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : आकड्यांचा पध्दतशीरपणे खेळ करून महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाने नागरिकांची मोठी निराशा केली आहे. 
जनतेला या अर्थसंकल्‍पाकडून मोठया अपेक्षा होत्या. परंतु नेहमी संभ्रमात काम करणाऱ्या या सरकारने या अर्थसंकल्पात सुद्धा असाच संभ्रम करून ठेवला आहे. 

विदर्भाच्या विकासासाठी कुठलीही भरीव तरतूद या अर्थसंकल्पात नाही. 
नियमित कर्ज फेडणा-या शेतकरी बांधवांना ५० हजार रू. प्रोत्‍साहनपर देण्‍याबाबतचे आश्‍वासन मागील अर्थसंकल्‍पात देण्‍यात आले होते. मात्र त्‍याची अंमलबजावणी यावेळी करण्यात आलेली नाही. केवळ घोषणांचा महापूर या अर्थसंकल्पात पाडण्यात आला आहे. या सरकारला जनतेच्या हिताशी काहीच घेणेदेणे नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 
 डॉ. परिणय फुके विधानपरिषद सदस्य यांनी मत प्रकट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत