Breaking News

शेगाव बू. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करा : प्रहार

शेगाव बू. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करा : प्रहार

प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात प्रहारचे मुंडण आंदोलन


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,वरोरा : तालुक्यातील शेगाव बू. येथील नव्याने बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उदघाटणाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई मुळे या इमारतीच्या लोकार्पनास विलंब होत आहे. यामुळे येथील प्रहारसेवक संतप्त असून दि.15 मार्चला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसमोरच मुंडन आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून देण्यात आला आहे.

        तालुक्यातील शेगाव बू. हे मोठया लोकसंख्येचे गाव असून परिसरातील लोकांसाठी मुख्य बाजारपेठ आहे.पोलीस स्टेशन, पेट्रोल पंपसह शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार असल्याने येथे येणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. शिवाय वरोरा -चिमूर या मुख्य रस्त्यावर गाव असल्याने अपघातांचेही प्रमाण जास्त आहे. जुने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास आणि योग्य त्या आरोग्य सुविधा पुरविल्यास रुग्णांना रेफर टू वरोरा करण्याची गरज भासणार नाही असे लोकांचे मत आहे.अपुऱ्या आरोग्य सुविधामुळे आजपर्यँत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.

        प्रहारसेवकांकडून अनेकदा प्रशासनाला याविषयीं निवेदने दिली गेली मात्र प्रशासनाला या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पनाचा विसर पडला कि ते एखाद्या चांगल्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहेत हेच समजण्या पलीकडचे आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी ही गंभीर नाहीत ही मोठया खेदाची गोष्ट असून लवकरच या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करून तज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी आणि आरोग्य सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात याव्यात यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दि.8 मार्चला देण्यात आले असून प्रशासनाचा निषेध म्हणून दि.15 मार्चला स्थानिक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर प्रहार सेवकांकडून मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत