Breaking News

आम आदमी पार्टी यूथ विंग ची चंद्रपुर महानगर कार्यकारणी जाहिर।

आम आदमी पार्टी यूथ विंग ची चंद्रपुर महानगर कार्यकारणी जाहिर।


महा घडामोडी न्युज नेटवर्क चंद्रपूर : दिल्ली नंतर पंजाब या राज्यात सरकार स्थापने नंतर आम आदमी पक्ष एक पर्याय म्हणून भारताच्या राजकरणास पर्याय म्हणून समोर आला आहे. विज पाणी आरोग्य शिक्षण सारख्या सुविधा कड़े आम आदमी पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे या सगळ्या सुविधा दिल्ली ते गल्ली पर्यन्त पोहोचविन्या करीता आम आदमी पक्षाने संगठन बांधनी वर जोर दिला आहे . चंद्रपुर जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे संगठन बांधनी चे काम जोरदार सुरु असून आज आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यानी, जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे कोषाध्यक्ष भिवराज सोनी, ऍड सुनिता पाटिल मैड़म यांचा प्रमुख उपस्थितित चंद्रपुर महानगर ची युवा कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ति पत्र देऊन जाहिर केली आहे.


   या मध्ये संतोष बोपचे अध्यक्ष, डॉ.देवेंद्र अहेर सचिव, चंदू माडूरवार उपाध्यक्ष, विजेंदर गिल उपाध्यक्ष, अक्षय ठाकुर उपाध्यक्ष, कालिदास ओरके कोषाध्यक्ष यांची नियुक्ति करण्यात आली आहे या वेळेच जिल्हा सचिव संतोष दोरखंडे,शहर सचिव राजू कूड़े, सिकंदर सागोरे,अशरफ सय्यद,सुनिल सदभये पदाधिकारी इत्यादि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत