Breaking News

16 एप्रिलला कोरठण खंडोबा चैत्र पौर्णिमा उत्सव

16 एप्रिलला कोरठण खंडोबा चैत्र पौर्णिमा उत्सव

 पारंपरिक जागरण गोंधळ विधींनी गड दिवस रात्र दुमदुमणार


महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, पारनेर : लाखो भक्तांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्रावर चैत्र पौर्णिमा उत्सव शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 ला आयोजित केलेला आहे. चैत्र पौर्णिमेला श्रीखंडोबाचे शृंगार दर्शन घडते. स.6 वा. देवाचे मंगल स्नान पूजा होऊन चांदीचे सिंहासनाचे व चांदीच्या उत्सव मूर्तीचे अनावरण करण्यात येईल. सर्व अलंकारिक साजशृंगार चढवून देवाचे उत्सवातील शृंगार दर्शन साकारले जाईल .
सकाळी 7.वाजता.-महाअभिषेक पूजा आरती होईल. 

सकाळी 9.वाजता- देवाच्या चांदीच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक  सवाद्य पालखीतून मंदिर प्रदक्षिणासाठी प्रस्थान करील .पालखीपुढे भावीक भक्त ओलांडा दर्शन घेऊन नवसपूर्ती मागतात. पालखी समवेत ढोल ,लेझीम ,वाजंत्री  भावीक भक्त यांची गर्दी असते. लेझीमच्या तालावर आणि सदानंदाचा येळकोट!  ,श्री साहेबा गुंजाळ ,श्री देविदास क्षिरसागर ,श्री किसन धुमाळ,  यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत