Breaking News

काकणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस उद्योजक जयवंत वाळुंज यांच्या तर्फे शालेय साहित्य भेट

काकणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस उद्योजक जयवंत वाळुंज यांच्या तर्फे शालेय साहित्य भेट 


महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, पारनेर : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील काकणेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस व अंगणवाडी केंद्रास उद्योजक व श्रीराम मित्र मंडळा चे अध्यक्ष यांच्या वतीने शालेय साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंत वाळुंज होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मी आणि आमचे मुंबईकर मंडळ नेहमीच कटिबद्ध आहोत. या आधी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल , शुद्ध पाण्याचे मशीन, एक मोठा LED भेट दिला आहे. माझे नेहमीच शाळेसाठी भरपूर योगदान आणि सहकार्य करत असते. मी स्वतः गरीब कुटुंबातील असून या शाळेचा माजी विद्यार्थी आल्यामुळे मला विद्यार्थ्यां विषयी सतत तळमळ असते.

              यावेळी बुद्धिमत्ता गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी कु.तन्वी वाळुंज,कु.मयूर वाळुंज, मार्गदर्शक शिक्षक बाळासाहेब खराबी, पांडुरंग भगत, शिक्षिका अलका खोडदे, वनिता सुंबे, ज्योती कर्डीले, अंगणवाडी शिक्षिका सुमन वाळुंज यांचा सन्मान मुबंईकर मंडळाच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी बुद्धीमत्ता गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कायम ठेव पावती म्हणून काकणेवाडी शाळेच्या दिवंगत आदर्श शिक्षिका कै.नंदादेवी बाळासाहेब वाळुंज यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब तुकाराम वाळुंज यांनी 25,000 हजार रुपये धनादेश जयवंत वाळुंज यांच्या हस्ते मुख्याध्यापक बाळासाहेब खराबी यांच्याकडे सुपूर्द केला.तसेच आपल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड असणारे निलेश लंके प्रतिष्ठान काकणेवाडीचे अध्यक्ष संभाजी वाळुंज यांनी शाळेसाठी 11,000 रुपये किमतीचा कलर प्रिंटर भेट दिला. या कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या वेळेस मा.पं.स.सदस्य प्रदीप वाळुंज, मा.सरपंच गिताराम वाळुंज, मा.व्हा.चेअरमन राजेंद्र झावरे,मा.सदस्या सौ.निर्मलाताई वाळुंज, ग्रामपंचायत चे सदस्य गोरख वाळुंज,मुबंईकर मंडळाचे सदस्य ह.भ.प.रघुनाथ महाराज वाळुंज, मधुकर झावरे,बाबासाहेब वाळुंज,ज्ञानदेव वाळुंज,सुभाष वाळुंज,सूर्यभान वाळुंज, रविंद्र वाळुंज,साहेबराव नवले,भास्कर वाळुंज,पोपट वाळुंज,बाजीराव वाळुंज,आकाश वाळुंज,अक्षय वाळुंज, ऋषिकेश वाळुंज व इंजि बबन वाळुंज, ह.भ.प.रंगनाथ महाराज वाळुंज,मा.अध्यक्ष सपंत वाळुंज, सोमेश्वर पतसंस्थचे व्यवस्थापक संदीप वाळुंज, शिक्षक विनायक पवार , संपत वाळुंज, प्रविण वाळुंज,अमोल वाळुंज, अनिल वाळुंज,शरद वाळुंज, काळूराम पवार, दत्तात्रय वाळुंज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक बाळासाहेब खराबी यांनी केले तर आभार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन वाळुंज यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत