मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ : आ. सुधीर मुनगंटीवार
मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ : आ. सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूर येथे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचा शुभारंभ
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असुन भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत. भगवान श्रीरामाच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपुर्ण राष्ट्राला जगण्याचा पथ दाखविलेला आहे.मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या आचरणातुन प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहुन सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकिय मर्यादा पाळत पुरूष सदाचरणी राहु शकतो याचे रामचंद्र प्रभु एक जिवंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
श्री रामनवमी निमित्ताने बल्लारपूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विधिवत पूजा करून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोभायात्रेचा शुभारंभ केला. यावेळी रामभक्तांनी
आ .मुनगंटीवार यांचा प्रभू राम दरबार देऊन प्रभूरामचंद्रानी त्यांना आशिर्वाद द्यावा अशी प्रार्थना करून त्यांना राम दरबाराची भेट दिली.यावेळी आ. मुनगंटीवार बोलत होते.यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल,माजी नगराध्यक्ष हरिष शर्मा, शिवचन्द दिवेदी, जैनुद्दीन जव्हेरी, काशी सिंग, मनीष पांडे, सत्यनारायण खेंगर, जितेश पोफली, रणांजय सिंग, बबलू गुप्ता, सरोज सिंग, कैलास जोरा आदींची उपस्थिती होती. जय श्री राम च्या जयघोषाने परिसर निनादून गेला होता.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत