Breaking News

पोलिसांचा कडा पहारा भेदून लाचखोर पोलिसाने धूम ठोकली

राजुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा कडा पहारा भेदून लाचखोर पोलिसाने धूम ठोकली

तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयन्त... पोलिसांची तारांबळ..!! 



महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, राजुरा : राजुरा येतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलिसांना ५० हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.लाचखोर दोन्ही पोलिसांना अटक केल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक चमुच्या ताब्यात होते.पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा कडा पहारा होता.असे असतांना सुध्दा राजेश त्रिकोलवार वय ५२ वर्षे या आरोपीनी पोलिसांचा पहारा भेदून धूम ठोकली व थेट नगर परिषद समोरील तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला पण एका 'जिगरबाज' पोलिसांच्या 'रेस्क्यू आपरेशन'मुळे आरोपीचा जीव वाचला.परंतु आरोपी हा पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या तावडीतून बाहेर पडून पळ काढल्याने आता पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व स्थानिक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.   


बल्लारपूर येतील एका तक्रारकर्त्यानी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलीस कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार केली.त्यानंतर नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील पानटपरीवर सापळा रचला व त्यात राजेश त्रिकोलवार वय ५२ वर्षे व सुधानशू मडावी वय ४५ वर्षे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ५० हजाराची लाच घेतांना अटक केली.अटकेनंतर त्या दोन्ही लाचखोर पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये आणले.कारवाई संदर्भात प्रक्रिया सुरू असतांनाच अचानक लघुशंकेचा बहाणा करून लाचखोर पोलीस राजेश त्रिकोलवार यांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. व आत्महत्या करण्यासाठी नगर परिषद समोरील तलावात उडी घेतली.तब्बल एक तास आरोपी हा पाण्यात होता व त्याला वाचविण्यासाठी काहीनी उडी घेतली.आरोपीला समजविण्याचा प्रयत्न केला पण आरोपी बाहेर निघण्यास तयार नव्हता.


 अखेर जिगरबाज पोलीस संपत पुलीपाका यांनी समजावुन बाहेर काढले. आता या नाट्यमय घडामोडींवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. मुळात पैसे घेतांना दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन आणले होते.यावेळी दोन्ही आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या ताब्यात होते.व पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा कडा पहारा होता.असे असतांना आरोपी राजेश त्रिकोलवार हा लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर पडला.व आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी घेतली. 


या नाट्यमय घडामोडी मुळे शंकेला पेव फुटले आहे.दरम्यान आरोपी त्रिकोलवार हा ड्रीपेशनमध्ये का गेला हाच कडीचा मुद्दा आहे.लाचेचे ५० हजार व बॅग मध्ये सापडलेले २ लाख ४० हजार रुपये कुणाचे आहे.कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी ही रक्कम जमा केली असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे.एवढेच नाही तर जमा केलेली रक्कम कुणी दिली याची सुध्दा यादी मिळाल्याने शंका निर्माण होत आहे. आत्महत्येचा प्रयत्न केला प्रकरणी त्रिकोलवार वर भादवी २२४ व 309 कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळ काढल्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथक व स्थानिक पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. 


उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी एवढी मोठी रक्कम कुणाच्या सांगण्यावरून घेतली हा संशोधनाचा मुद्दा आहे.त्यातच आरोपी हा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या ताब्यात होता.व पोलीस स्टेशनमध्ये कडा पहारा होता.असे असतांना सुध्दा आरोपी पळ काढतो ही एक गंभीर बाब आहे.मुळात आरोपी हा ड्रीपेशन मध्ये होता.त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी केल्यास या लाचेच्या प्रकरणात मोठे मासे गळाला लागू शकते.
एजाज अहमद,कार्याध्यक्ष, राजुरा काँग्रेस कमिटी राजुरा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत