Breaking News

टिप्परच्या धडकेत तरुण ठार एक गंभीर

टिप्परच्या धडकेत तरुण ठार एक गंभीर

 मित्राच्या लग्नाला जात होते दुचाकीने.


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम, लाखांदूर : मित्राच्या लग्नाला जाताना अज्ञात टिप्परने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील परसोडी (नाग) येथे बुधवारी सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास घडली.


  मंगेश राजकुमार भागडकर( 31) राहणार अहेर नवरगाव तालुका ब्रह्मपुरी असे मृतकाचे नाव आहे .वितेस सुरेश करनकर 25 असे गंभीर चे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगाव येथील एका तरुणांचे लग्न तालुक्यातील डोके सरांडी येथे बुधवारी आयोजित होते .त्यामुळे मंगेश आणि वीतेस दोघेजण आपल्या दुचाकीने अहेर नवरगाव वरून डोके सरांडी येथे येत होते दरम्यान पाहून गाव ते परसोडी मार्गावर समोरून आलेल्या एका टिप्परने दुचाकीला धडक दिली.


यात दोघेही खाली कोसळले मंगेश आणि नितेश गंभीर जखमी झाले. जखमीला तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने मंगेश ला भंडारा येथे पाठविण्यात आले, उपचार दरम्यान मंगेश चा मृत्यू झाला तर वितेसवर लाखांदूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार लांजेवार यांनी सांगितले .या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत