Breaking News

बस्थानक तें महावीर चौक सिमेंट रोड व गटु रोडचे भूमीपूजन

बस्थानक तें महावीर चौक सिमेंट रोड व गटु रोडचे भूमीपूजन

महा घडामोडी आणि तालुका प्रतिनिधी सूरज शहाणे परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला शब्द पाळून काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी तीर्थ क्षेत्र विकासनिधीतून 9लाख रुपये गटू व रोड साठी व जनसुविधा निधीतून सिमेंट रोड साठी 7लाख रुपये असा एकूण 16लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.शनिवार 28में रोजी चारठाणा बस्थानक तें महावीर चौक सिमेंट रोड व गटु रोडचे भूमिपूजन काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

या भूमिपूजन प्रसंगी बोलताना नानासाहेब राऊत म्हणाले किं आपण ग्रामपंचायत निवडणुकीत या रस्त्याच्या कामाचा शब्द दिला होता. त्या शब्दाचा पुरतत्तेसाठी शासन दरबारीं विशेष प्रयत्न केले. तीर्थक्षेत्र विकासनिधीतुन गटू रोड साठी 9लाख रुपये तर जणसुविधा निधीतून सिमेंट रस्त्यासाठी 7लाख रुपये असा एकूण 16लाख रुपयाचा निधी गावासाठी आपण उपलब्ध करून दिला आहे रस्त्याचा प्रशन मार्गी लागनार असल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच अनिरुद्ध चव्हाण, बापूराव महाराज चव्हाण, शेख इस्राईल, भगवान राव सोनटके, कसीम इनामदार,उपसरपंच वाजेद कुरेशी,पाशा इनामदार,सय्यद रहेमत अली,रामराव रासनिक नाना निकाळजे,रामराव चव्हाण,सय्यद खैसर,माजी उपसरपंच तहेसीन देशमुख,विजय गजमल यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत