राजा शिवछत्रपती परिवारातर्फे रक्तदान मोहीम सम्पन्न
राजा शिवछत्रपती परिवारातर्फे रक्तदान मोहीम सम्पन्न
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी जाफर मन्यार जळगाव ; गडकिल्ले सर्वधन हेच शिवकार्य हा विचार घेऊन गडकिल्ल्याची सेवा करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या मावळ्यांनी 6 जून रोजी राज्याभिषेक दिनी मोहीम आयोजित केली होती पण जिल्हा रुग्णालय जळगाव येथील रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी रक्ताच्या कमतरते अभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे परिवाराच्या मावळ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने मोहिमेसाठी कोणताही मुहूर्त न काढणाऱ्या महाराजांचेच ते मावळे असल्याने तात्काळ नियोजन करीत काल 29 मे रोजीच मोहिमेचे आयोजन केले. त्याला जळगाव जिल्हाभरातून परिवाराच्या मावळ्यांनी साथ देत रक्तपेढीत येऊन 44 रक्त पिशव्या रक्ताचे दान करून 8 दिवस अगोदरच छत्रपतींना राज्यभिषेकासाठी रक्ताभिषेक केला.
रक्तदान मोहिमेत साधारण पुरुषच अग्रभागी असतात पण या मोहिमेत परिवाराच्या 8 रणरागिणी रक्तदानासाठी पुढे आल्या होत्या हे विशेष सर्वानी स्वेच्छेने रक्तदान करून महाराजांना अभिवादन केले इतर महिलांनी पण रक्तदानासाठी पुढे महिला रक्तदानात मागे असतात हा समज खोडुन काढावा असे मनोगत परिवाराचे उपविभाग प्रमुख अमोल पाटील यांनी काढले सौ ममता दीघडे सौ विजया पाटील, सौ शीतल महाजन, कु मानसी चव्हाण डॉ. स्नेहा वाडे यांचे त्यांनी रक्तदानासाठी स्वयस्फूर्तीने पुढे आल्या बद्दल आभार मानले मावळ्यांना या प्रसंगी अल्पोपहार व चहा पानाची व्यवस्था कविरा ग्रुप कडून करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले मोहीम यशस्वी होण्यासाठी मावळे विनोद दीघडे ,सूर्यकांत पाटील , सुनील पाठक , रोहन भावसार , डॉ. दीपक पाटील,देवकर मॅडम, यांनी मेहनत घेतली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत