पाण्याच्या प्रश्नाबाबत हेटी नांदगाव गावाला शिवसेना महिला आघाडीने भेट देत जाणून घेतल्या समस्या
पाण्याच्या प्रश्नाबाबत हेटी नांदगाव गावाला शिवसेना महिला आघाडीने भेट देत जाणून घेतल्या समस्या
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,चंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव येथे गावापर्यंत आलेली जलवाहिनी फुटलेली आहे व अनेक भागांमध्ये नळच येत नाही. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे नाल्यात खड्डा करून ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. ही गंभीर समस्येची माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. उज्वला नलगे यांनी गावाला भेट देत महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.
गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव येथे पाण्याची गंभीर समस्या आहे. कोणतेही राजकीय पक्ष या समस्येकडे लक्ष देत नाहीत. गावात पाणीच नसल्याने तेथील तरुणांना मुलगी द्यायला तयार नाही. या पाण्याच्या समस्येबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा कानाडोळा केला जातो. ह्या गंभीर समस्येची माहिती शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांना मिळताच त्यांनी गावकऱ्यांची ही समस्या त्वरित सोडविण्याची प्रशासनाकडे मागणी केली.
सोबतच चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वला नलगे यांना गावात जावून समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडीने हेटी नांदगाव येथे जाऊन पाण्याच्या समस्येची पाहणी केली. तेथील गावकरी व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. व या गंभीर समस्येबाबत आपण पाठपुरावा करून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे, कुसुमताई उदार, विकासभाऊ विरुटकर, सूप्रित रासेकर, शामली रासेकर यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.यासंदर्भात लवकरच निवेदन देणार असल्याचे सौ. नलगे यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत