Breaking News

पिएम किसान सन्मान निधी योजनेतील त्रुटी दुर करा

 

भाजप किसान मोर्चा सेलु तर्फे प्रशासनाला निवेदन

पिएम किसान सन्मान निधी योजनेतील त्रुटी दुर करा

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सूरज शहाणे,सेलू : पिएम किसान सन्मान निधी योजनेतील त्रुटी काढुन नविन नोंदनीचे प्रस्ताव सुरळीत करण्या संबंधी मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी सेलु यांना लेखि निवेदन देण्यात आले,शेतकर्यांच्या प्रलंबीत असलेल्या पिएम किसान सन्मान निधी योजनेच्या त्रुटी व ईतर समस्या सोडविण्याच्या कामाला महसुल प्रशासनाने बंध केले असुन हे काम क्रषी विभागाचे आहे क्रषी विभागाकडे गेल्यावर ते तहसिल कार्यालयात जा असे सांगुन शेतकर्यांची टोलवाटोलवी करीत आहेत.

 दोन्ही विभागातील अधिकारी एकमेकावर जबाबदारी ढकलुन वेळ काढु पणा करीत आहे,त्यामुळे शेतकर्यांचे अनेक प्रस्ताव धुळ खात पडुन आहेत यामुळे या योजनेपासुन शेतकरी वंचित राहत आहेत,सदरील योजनेतील त्रुटी शासनाने दुर करावी व पिएम कीसान योजनेच्या कामाला गती द्यावी.

 अन्यथा सेलु भाजपा किसान मोर्चा तर्फे तिव्र अंदोलन छेडण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन दगडोबा जोगदंड पाटील भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष,गोविंदराव मगर् मारोतराव गायकवाड,बळिराम गटकळ,सुदाम आरे,प्रभाकर कलाल,अजहर पठाण आदींनी निवेदन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत