Breaking News

बैलबंडीने गाठावे लागते पोंभुर्णा तालुकास्थळ

बससेवे अभावी तालुक्याला अंतर्भूत गावांची गैरसोय 

पायी वा बैलबंडीने गाठावे लागते तालुकास्थळ





महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,पोंभुर्णा : पोंभुर्णा हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्याला जाण्यासाठी जुनगाव येथून सकाळची बससेवा सुरू नाही. नागरिकांची गैरसोय होत आहे. देवाडा बुज, जुनगाव, घोसरी, फुटाना, मोकासा, चेकफुटाना, सेलुर, कोसंबी ही गावे पोंभुर्णा तालुक्यात अंतर्भूत आहे. मात्र, येथील नागरिकांना तालुका मुख्यालयी जाण्यासाठी कोणतीच सोय नाही. बैलबंडी वा पायी तालुक्याला जावे लागत आहे. वाहतुकीचे साधन नसल्याने पायी वा बैलबंडीने प्रवास करून तालुका गाठावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडल्याने ऑटोने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पोंभुर्णा ते जुनगाव ही बससेवा सकाळ व सायंकाळ अशा दोन वेळेत सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत