Breaking News

नगर पंचयातिच्या ढिसाळ कारभारामुळे गोंडपीपरी तालुक्यातील अग्निशामक यंत्र धूळखात

नगर पंचयातिच्या ढिसाळ कारभारामुळे गोंडपीपरी तालुक्यातील अग्निशामक यंत्र धूळखात


 आपत्तीकाळात पोंभुर्णा तालुक्यातील अग्निशामक वाहनाची घ्यावी लागते मदत.





महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,संतोष मडावी,चंद्रपूर ; लाखो रुपये खर्च करून शासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्याकरिता गोंडपीपरी या दुर्गम भागात अग्निशामक यंत्र मंजूर केले.ही गाडी गोंडपिपरी शहरात दाखल होऊन जवळपास वर्षभराचा काळ लोटला आहे मात्र शासकीय यंत्रणेनी या यंत्राकरिता पुरेसा निधी, आवश्यक मनुष्यबळ ,आणि गाडी उभी ठेवण्याकरिता हक्काची जागा उपलब्ध करून दिली नाही.त्यामुळे ही अग्निशामक यंत्रणा सध्या धूळखात पडली असून तिचा आपत्ती काळात कुठल्याच प्रकारचा वापर होत नसल्याने हे यंत्र ' शोभेची वास्तू' बनली आहे.


आपत्तीकाळात लगतच्या पोभूर्णा तालुक्यातील अग्निशामक यंत्राचा गोंडपीपरी तालुक्यात उपयोग होताना दिसत आहे.ही तालुक्यासाठी खेदाची बाब असून अश्या प्रकारातून येथील नगर पंचायतीचा ढिसाळ व नियोजन शून्य कारभार समोर आला आहे.


तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षात शेतात तनसीच्या ढिगाऱ्या सोबतच धानाच्या पुंजण्याला आग लागण्याच्या घटना घडल्या.एवढंच नाही तर घराला सुध्दा आग लागण्याची घटना घडल्या असून आग विझविण्याकरिता बल्लारपूर येथून अग्निशामक दलाला बोलवन्याची पाळी आली.त्यामुळे गोंडपीपरी तालुक्यातील अशा घटनेवर वेळीच नियंत्रण घालता यावे याकरिता तालुक्यात अग्निशामक दलाची गाडी मंजूर करण्यात यावी ही मागणी होऊ लागली.


राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून डीपीडीसीतून ८६ लाख रुपये मंजूर करीत अग्निशामक दलाची गाडी मंजूर केली.अगदी नगर पंचायत निवडणुका जवळ असताना या गाडीचे विधिवत पूजन सुद्धा करण्यात आले.


तालुक्याला अग्निशामक दलाची गाडी आपत्ती सेवेसाठी उपलब्ध असल्याचा गवगवा सुद्धा करण्यात आला. अश्यातच दिनांक २ मे रोजी तालुक्यातील चेक लिखित वाडा येथे शॉट सर्किट होऊन तीन घरे आगीत बेचिराख झाली मात्र आग शमाविण्याकरिता लगतच्या पोंभूर्णा येथून अग्निशामक दलाची गाडी बोलवण्यात आली. त्यामुळे गोंडपीपरी तालुक्याला दिलेली गाडी ही केवळ शोभेची वस्तू ठरली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


सुरगाव येथील पाणी पूरवठा प्लँट च्या जागेवर सदर 'अग्निशामक दल'चे वाहन उभे आहे. 
यातून गोंडपीपरी नगरपंचायतिचे ढिसाळ नियोजन दिसुन येत आहे.वर्ष भरापूर्वी शहरात दाखल झालेल्या गाडीला नगर पंचायततिच्या नियोजन शून्य कारभारामुळे सदर गाडी धूळ खात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


वाहन उभे करण्यास अजूनही पार्किंग ची व्यवस्था न झाल्याने गाडी तिथेच आहे.
तर अद्याप गाडी चालकाची नियुक्ती व त्याला लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यात नगर पंचायत मार्फत कोणतेच पाऊल उचलल्या गेले नाही.नगर पंचायत येथे काँग्रेस ची सत्ता आहे.नगराध्यक्ष सुद्धा काँग्रेस चे आहेत असे असताना मात्र काँग्रेस चे आमदार यांनी आपत्ती व्यवस्थापनसाठी नगर पंचायत ला दिलेल्या गाडीची कुठलीच कार्यवाही न करणे यावरून नगरसेवक यांची कार्यकुशलता किती आहे हे दिसून येते.


 केवळ निवडणुका आल्या की गाजावाजा करायचा आणि वेळ आली की तालुक्यात उपलब्ध असून सुद्धा दुसऱ्या तालुक्यातून अग्निशामक दलाच्या गाडीची मदत घ्यायची हि तालुक्यासाठी अत्यंत खेद जनक बाब असून लवकरात लवकर अग्निशामक दलाच्या गाडी बाबत ज्या काही अडचणी असतील त्या जातीने लक्ष देऊन आमदार महोदय सोडवतील काय? असा प्रश्न आता तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.


नगरपंचायत ला अग्निशामक दलाची गाडी येऊन जवळपास सात महिन्याचा कालावधी झाला मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या स्वतः दाराकडून हे यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता कुठलीच प्रक्रिया केल्या गेली नसल्याकारणाने गाडी आहे त्याच अवस्थेत आहे.
     चेतन गौर, भाजपा नगरसेवक.न.प. गोंडपिपरी.
अग्निशामक यंत्रणा सुरू करण्याकरिता नगरपंचायत मार्फत सर्व प्रक्रिया प्रोसेसमध्ये आहेत. लवकरच अग्निशामक दलाच्या गाडीचा प्रश्न मार्गी लागेल
सौ सविता कुडमेथे,नगराध्यक्ष, नगरपंचायत गोंडपिपरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत