Breaking News

अखेर जमिनीत गाडलेल्या मृतदेहाचे आरोपी गजाआड

 

अखेर जमिनीत गाडलेल्या मृतदेहाचे आरोपी गजाआड

  24 तासात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,खेमचंद नेरकर, वरोरा : तालुक्यातील ग्राम वडधा सोसायटी जंगलातील तलावाजवळ एका जागी डुंबरासारखा उंच मातीचा भाग ,त्यावर काट्या व दगड टाकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी कार्यकारी दंडाधिकारी तहसील कार्यालय वरोरा यांना प्राचारण करण्यात आले आणि जमिनीत पुरून असलेला मानवी सांगाडा बाहेर काढला असता फिर्यादि ने मृतकचे कपडे व चप्पल वरून तो सांगाडा मारोती लेथु रामगडे वय 50 वर्ष रा.मांगली ता.वरोरा यांचा असल्याची खात्रीने सांगितले.

   घटनास्थळी पोलीस अधीक्षक चंद्रपूर अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी वरोरा, आयुष् नोपाणी,उपविभागीय पोलीस अधिकारी ,आर्थिक गुन्हे चंद्रपूर शेखर देशमुख यांनी भेट देऊन गुन्ह्याचे तपासाबाबत मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणणे करिता सूचना दिल्या.

वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वरोरा दीपक खोब्रागडे,यांनी दोन पथके तयार करून गोपनीय माहितीची सांगड घालून

शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला असता गुन्ह्यात आरोपी दिलीप सोनबा कोरझरे वय 42 वर्ष ,रा.मांगली, ता .वरोरा,चंद्रभान जनार्धन येडसे वय 26 वर्ष ,रा.मांगली,ता.वरोरा,किसन फकरू ढोबरे वय 25 वर्ष,रा.बेघर वस्ती मांगली,ता.वरोरा,जनार्धन तारू येडसे वय 45 वर्ष,रा.मांगली (पोड),ता.वरोरा,चंद्रभान उर्फ बाबाराव आण्याजी खडसंग ,रा.वडधा सोसायटी,ता वरोरा या आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

  सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाचे आत उघडकीस आणला ,पाचही आरोपितांना 28 मे 2022 रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.मृतकचा पुरून असलेला सांगाडा तपसणीकरिता न्याय वैद्यकशास्त्र विभाग चंद्रपूर येथे रवाना करण्यात आला असून पुढील तपास सपोनि राहुल किटे करीत आहे.

  सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ,सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी वरोरा,उपविभागीय पोलीस अधिकारी आर्थिक गुन्हे चंद्रपूर यांचे अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वरोरा दिपक खोब्रागडे, तपास अधिकारी सपोनि राहुल किटे,पोउपनी सर्वेश बेलसरे,पोउपनी सचिन मुसळे ,बीट अंमलदार सपोउपोनी नरेश टिपले,डीबी पथक अंमलदार पोहवा दिपक दुबे,दिलीप सूर,नापोआ किशोर बोढे, मोहन निषाद,प्रविण निकोडे,पो अ सूरज मेश्राम,कपिल भांडारवार यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत