गुप्तांगाला दोरी बांधून खून करणारा निघाला आचारी
गुप्तांगाला दोरी बांधून खून करणारा निघाला आचारी
पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. गुरुवारी दुपारी पावणेगाव येथील कालव्याजवळ गोपाळचा मृतदेह आढळून आला होता व त्यांच्या गुप्तांगावर दोरी बांधली होती. त्यावरून त्याची हत्या झाल्याचे समजते. मृतदेहाची ओळख पटली नसल्यामुळे पोलीस कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नव्हते. कळमना पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या गुन्ह्यांचा तपास केला.
१९ मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गोपाल बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी गोपालच्या नातेवाइकांना मृतदेह दाखवला असता त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. १८ मे रोजी दुपारपासून गोपाल बेपत्ता होते. शेवटच्या वेळी ते तिरंगा चौकात दारूच्या नशेत फिरत होते.
पोलिसांनी तिरंगा चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी कुश्लेष तिवारीसोबत ते दुचाकीवरून जाताना दिसले. शुक्रवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता, असे त्याचे म्हणणे आहे. गोपाळला दुचाकीवर बसवून पवनगाव येथे आणले. तेथे गुप्तांगाला दोरी बांधून तो निघून गेला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत