Breaking News

नवसंकल्प सोशल मीडिया शिबिराचे नागपुर येथे आयोजन

 नवसंकल्प सोशल मीडिया शिबिराचे नागपुर येथे आयोजन

भंडारा जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, भंडारा : नागपुरातील वनामती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नव संकल्प सोशलमीडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय मंत्री श्री विलास मुत्तेमवार, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार श्री विकास ठाकरे सोबत लोकप्रिय आमदार "अभिजित दादा वंजारी", मुख्यप्रवक्ते श्री अतुल लोंढे, श्री विशाल मुत्तेमवार प्रमुख्याने उपस्थित होते.

हे कार्यक्रम सोशल मीडियावर आधारित असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जागृत करावा याबाबत विविध प्रकारचे वक्त्यांनी अनेक संभाषण केले व नवा संकल्प शिबिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसच्या बाबत जागृत करून काँग्रेसला आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवण्याकरिता एक ध्येय गाठण्यात आला भंडारा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष मोहन भाऊ पंचभाई, याच्या द्वारे

निवड समिती अंतर्गत श्री. पवन मस्के जिल्हा सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सहभाग नोंदविला होता. पवन मस्के हे जिल्ह्यात काँग्रेसला अधिक बळकट करण्याकरिता सतत प्रयत्नशील असतात. त्यासोबत विनीत देशपांडे ,सचिव जय डोंगरे, युवक जिल्हाउपाध्यक्ष, अमित खोब्रागडे आदी अनेक जिल्हातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोदविला होता. उपस्थित पदाधिकाऱ्यांना या बाबत प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत