Breaking News

जावयाने केला सासऱ्याचा खुन करुन मृतदेह फेकला कालव्यात

जावयाने केला सासऱ्याचा खुन करुन मृतदेह फेकला कालव्यात
  


महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम, भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कौटोंबिक कलहातुन जावयाने सासराचा खुन करुन मृतदेह गोसे खुर्द धरनाच्या उजव्या कालव्यात फेकला. मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उतरलेल्या भावाला पोहता येत नसल्याने त्याचाही कालव्याच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाला. 


हि घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात घडली. हरी नागपूरे रा.सिंधी असे मृतक सासराचे नाव आहे .त्याचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्या भावाचे नाव चंद्रभान नागपुरे असे आहे. तर सासराचा खुन केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव अनिल हटवार रा. वाही असे आहे आरोपी जाव‌ई अनिल हटवार याला पोलिसांनी अटक केली असुन अधिक तपास सुरू आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत