Breaking News

नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी

नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी  



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे  बांधकाम पुर्ण होऊनही आरोग्य केंद्र सुरु झाले नसल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरु करण्याची  मागणी आमदार सुभाष धोटे यांना करण्यात आली आहे


राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या उपचाराची सोय व्हावी याकरीता आमदार सुभाष धोटे यांनी अथक प्रयत्न करुन राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये ४ प्राथमिक आरोग्य केंद्र , शासनाकडून मंजूर करवून घेतले प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता १० कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारती करीता आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने २ कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी मिळाला काही दिवसापुर्वी नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले आहेत.


आरोग्य विभागाच्या लेट लतीफीमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रासह महाराष्ट्रातील  एकूण  ८६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने आमदार सुभाष धोटे  प्रयत्नशील आहेत.लवकरच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन मा.  मुख्यमंत्री , मा.आरोग्यमंत्री व जिल्ह्यांचे पालकमंत्री ऑनलाईन करणार असल्याची माहिती आहे 


 जिल्हा परिषद , पंचायत समिती व अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत यामुळे श्रेय घेण्यासाठी काही ग्रामपंचायत सदस्या कडून सोशल मिडीया व बातम्यांमध्ये  निवेदन देऊन पुलाचे काम मार्गी लावा  प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करा अन्यथा आमरण उपोषण करु अशी निवेदने देवुन प्रसिद्धी मिळवण्याचे काम सुरू आहे  


 प्रशासनाकडून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे सांगण्यात येत आहे नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याकरिता आमदार सुभाष धोटे व प्रशासनास अनेकदा निवेदने देण्यात आली आहे.


नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याकरिता आमदार सुभाष धोटे यांनी  प्रशासनाला निर्देश देवून तातडीने नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी गणेश लोंढे व महेश राऊत यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत