Breaking News

प्रहार अपंग क्रांति संघटनेचे जिल्हाधिकारी यांना जिल्ह्य़ातील अपंगांच्या मागण्याचे निवेदन

 प्रहार अपंग क्रांति संघटनेचे जिल्हाधिकारी यांना जिल्ह्य़ातील अपंगांच्या मागण्याचे निवेदन

भंडारा जिल्ह्यातील दिव्यांगाच्या (अपंगांच्या ) समस्याचे निराकरण करून, मागण्यांची पूर्तता करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्‍वासन.


 महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,
भंडारा : अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्काचे  संरक्षण) अधिनियम १९९५ दि.७ फेब्रुवारी १९९६ पासून लागू झाला असून तसेच दिव्यांग अधिनियम २०१६ या कायद्यान्वये अपंग व्यक्तीचा सर्वांगीण विकासासाठी व त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आल्या. परंतु ह्या शासन निर्णयाची सर्व अधिकारी, 


पदाधिकारी यांना जाणीव असून सुद्धा त्याकडे अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अपंगाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना त्रासही सहन करावा लागतो. दिव्यांग (अपंग) हा समाजातील दुर्लक्षित घटक असून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे दिव्यांग बांधवांचे सहजतेने जगणे कठीण झाले आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत. 

यासंदर्भात अनेकदा जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात आली. तरी पुन्हा दिव्यांग बांधवांच्या समस्येबाबत काल दि.२६/०५ /२०२२ ला निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांचे कडून आणि संबधित विभागाकडून अंमलबजावणी संबंधी कारवाही त्वरित करावी अशी विनंती करण्यात आली. 

दिव्यांग बांधवांच्या मागण्या... 

जिल्हा खनिकर्म निधीतून एडिफ योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणारी स्वयंचलित सायकल, कुबड्या, काठी, श्रवणयंत्र यांसारखे आवश्यक असलेली साहित्य व साधने पुरविणे. गेल्या ४ वर्षापूर्वी घरकुल योजनेसाठी दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले त्या “ड” यादीतील दिव्यांग,अनाथ, विधवा व परितक्ता यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. ग्रामपंचायत स्थरावरील दिव्यांगाना २.५० लाख रुपये वाली घरकुल योजनाचा लाभ देण्यात यावा. भंडारा जिल्ह्य़ातील सर्व दिव्यांगाना २०२० पासून अंत्योदय राशन कार्ड चा लाभ मिलत नाहीं आहे, तरी तो मिळवून द्यावे. 

दिव्यांग बांधवाना विनाअट व्यापारी गाळे आरक्षणानुसार  देण्यात यावे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या निर्देशानुसार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध  करून देण्यात यावे. जिल्ह्यातील दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचे देण्यात येणारे मानधन दरमहा देण्यात यावे.दिव्यांगांची स्वयंरोजगारासाठी शासकीय योजनाचे कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली काढावे.

(गेल्या ३ ते ४ वर्षापासून अनेक प्रकरणे बँकाकडे प्रलंबित असलेल्या बॅंकांना प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देण्यात यावे.)

निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष प्रहार अपंग क्रांति आंदोलन संघटना- रवी मने, जिल्हा सचिव- योगेश्वर घाटबांधे, लाखनी तालुका अध्यक्ष- सुनिल कहालकर, प्रेमचंद निर्वाण, श्रावण गिर्‍हेपूंजे, शैलेश उरकुडे, इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत