सविधान आर्मी तर्फे लाँग मार्च भोकरी ते रावेर तहसीलदार कार्यालय येथे पायी धडकला रेल रोको आंदोलन
सविधान आर्मी तर्फे लाँगमार्च भोकरी ते रावेर तहसीलदार कार्यालय येथे पायी धडकला व रेल रोको आंदोलन संपन्न
महा घडामोडी न्यूज, प्रतिनिधी दिपक तायडे, रावेर : सविधान आर्मीच्या वतीने विविध 10 संघटना तर्फे विविध मागण्यांसाठी सकाळी 10 वाजता *लाँग मार्च* पायी लहान लहान मुले,स्त्रीया,व कष्टकरी आणि शेतकरी व केळी मजूर एका हातात तिरंगा व एका हातात संविधान व संविधान निर्माते यांचा फोटो व संविधाना चा विजय असो, हमारी मांगे पुरी करो, वर्ण खुर्ची खाली करो तहसील कडे गगनभेदी घोषणा देऊन निघाले होते....हा लाँग मार्च व रेल रोको आंदोलन दिनांक 18 मेला 22 रोजी निघाला.
भोकरी ते रावेर तहसीलदार कार्यालय येथे लाँग मार्च धडकला व जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आणि तहसीलदार स्वतः निवेदन घेण्यासाठी येणार नाहीत तो पर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करू हा निर्धार संविधान रक्षक सैनिकांनी केला आणि ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते आणि तहसीलदार श्री. संजय तायडे साहेब मोर्चेकरी समोर आले आणि निवेदन स्विकारले मग लाँग मार्च रेल्वे स्टेशन कडे रेल रोको साठी निघाला होता.
तसेच दुपारी 2 वाजता रावेर रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन ही झाले लाँगमार्च चे नेतृत्व सविधान आर्मी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगनभाऊ सोनवणे व सविधान आर्मी चे राकेश भाई बगगण व युवा जळगाव जिल्हाध्यक्ष मा सिध्दार्थ भाऊ झाल्टे ,अशोक भाई अटकाडे रावेर तालुका प्रमुख संविधान आर्मी आणि संविधान आर्मी प्रदेश प्रमुख अल्पसंख्याक आरिफ भाई शेख, ओबीसी सेल प्रदेश प्रमुख संविधान आर्मी गोपी भाऊ साली, रावेर समीर शेख शहर प्रमुख संविधान आर्मी यांच्या नेतृत्वाखाली रावेर तहसीलदार कार्यलय व रेल्वे स्टेशन ह्या ठिकाणी नेऊन रावेर नायब तहसीलदार श्री संजय तायडे साहेब रावेर व रेल्वे स्टेशन मास्तर यांना निवेदन देण्यात आले .
सविधान आर्मी चे रावेर तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे यांच्या भोकरी गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांना एक करून विविध मागण्या चे निवेदन देऊन घोषणा देऊन सर्व रावेर शहर दणाणले व लाँगमार्च येथे उपस्थित प्रदेश अध्यक्ष मा राकेशभाई बग्नन आरीफ भाई महाराष्ट्र चे नेते ग़पीभाई साळी महिला जिल्हाध्यक्ष संगिता ताई मोरे रावेर तालुका अध्यक्ष अशोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष चाँदखा तडवी रावेर तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे दिव्यांग तालुका अध्यक्ष दिनेश सैमिरे रावेर शहरध्यक्ष समीर भाई रावेर अल्पसंख्याक अध्यक्ष ईम्रानभाई मेबर दिव्यागं तालुका उपाध्यक्ष कामीलभाई आदिवासी सेलचे तालूका उपाध्यक्ष लालखा तडवी ईरफान तडवी दीपक लहासे विकास लहासे जगदीश लहासे रामकृष्ण लहासे संतोष लहासे मधुकर लहासे राष्ट्रवादी चे जिल्हाउपाध्यक्ष सलिमभाई व सर्व रावेर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
==



कोणत्याही टिप्पण्या नाहीत