विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जवळा गांजीभोयरे बस सेवा सुरू करा
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जवळा गांजीभोयरे बस सेवा सुरू करा
राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष विकास गिरी यांची मागणी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नगर ; पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील विकास गिरी यांची नुकतीच राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस पार्टीच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली. असून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. विकास गिरी हे एक युवकांमधील लोकप्रिय नेतृत्व असून विद्यार्थ्यांच्या सामाजिक प्रश्नांवर ती ते नेहमी आक्रमक भूमिका घेत काम करत असतात त्यांनी निवडीनंतर पहिल्याच दिवसापासून सामाजिक कामाला सुरुवात केली असून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी मध्ये सक्रिय झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा अतिशय महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे ग्रामीण भागामध्ये वेळेवर एसटी बस येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गांजीभोयरे ते जवळा बस त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी गांजीभोयरे ग्रामपंचायतीच्या वतीने व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नवनिर्वाचित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष विकास गिरी व गांजीभोयरे गावचे उपसरपंच आनंदराव झंझाड यांनी पारनेर आगाराचे प्रशासकीय अधिकारी श्री कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी बोलताना विकास गिरी म्हणाले की जवळा व गांजीभोयरे परिसरांमधून पारनेर शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी येत आहेत. त्यांची होणारी गैरसोय व नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाने त्वरित बससेवा त्या भागात सुरू करावी अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत