Breaking News

कुत्र्यामार्फत चीतळाची शिकार , २ इसमांना अटक

कुत्र्यामार्फत चीतळाची शिकार , २ इसमांना अटक 

 उमरझरी कक्ष १०१ मधील घटना 

आरोपींची कारागृहात रवानगी


 महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या नियतक्षेत्र उमरझरी येथे कुत्र्याच्या मदतीने चीतळाची शिकार करून मास विक्रीच्या तयारीत असलेल्या २ इसमांना विशेष व्याघ्र संरक्षण दलाची चाहूल लागताच पळून गेले. पण श्र्वान पथकाद्वारे शोध मोहीम राबवून २ इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे राजकुमार शिवराम वाढई(४९) आणि रामकृष्ण सोमा सोनवाणे(५२) रा. उमरझरी अशी आहेत. त्यांचेवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाअन्वये वन गुन्ह्याची नोंद करून २ आठवड्याचे न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले करीत आहेत. 


         नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोन मध्ये तृणभक्षी प्राण्यांचा वावर असल्यामुळे अनेक शिकारी टोळ्या कार्यरत असून कुत्रे , फासे अथवा बंदुकीच्या साहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करतात. विशेष व्याघ्र संरक्षण दल वनक्षेत्रात गस्तीवर असतांना लाखनी वन परिक्षेत्रातील बीट व नियतक्षेत्र उमरझरी कक्ष क्रमांक १०१ मधील नाल्यालगत मृत चितळ प्राण्याच्या मास विक्रीसाठी शिकार ओढत शेताजवळ आणले. 


शिकारीच्या संशयावरून शोधार्थ असलेले विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या पथक आल्याचा सुगावा लागताच आरोपी शिकार सोडून पसार झाले. याबाबद लाखनी चे वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांना माहिती देऊन श्र्वान पथकाचे साहाय्याने घटना स्थळावर सापडलेल्या आरोपींच्या चपलाच्या वासाने मागोवा घेत गावात पळून गेलेल्या राजकुमार वाढई व रामकृष्ण सोनवाणे यांना शोधून विचारपूस केली असता त्यांनी चितळाची शिकार केल्याची कबुली दिल्याने मृत चितळ मास कापण्यकरिता वापरण्यात आलेले सत्तुर , कुऱ्हाड आणि सायकल जप्त करण्यात आली. 


आरोपीसह घटनास्थळावर शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांचे स्वाधीन करण्यात आले. त्यांचेवर प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पकडण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून त्यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी साकोली यांचे समक्ष उभे केले असता न्यायालयाने आरोपींना १३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पारीत केल्याने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. उपवन संरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले पुढील तपास करीत आहेत. क्षेत्र सहाय्यक तांडेकर , उमरझरी वनरक्षक कोदाने , उशीर ,  पडोळे यांनी चौकशीकामी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत