साकोली येथे वंचित बहुजन आघाडीचा संकल्प मेळावा संपन्न
साकोली येथे वंचित बहुजन आघाडीचा संकल्प मेळावा संपन्न
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : साकोली येथील संताजी सभागृहामध्ये भंडारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची संकल्प सभा संताजी सभागृहात घेण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावणजी नंदेश्वर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य समन्वयक पूर्व विभाग डॉ रमेशकुमार गजबे, भंडारा जिल्हा प्रभारी व समन्वयक भंडारा जिल्हा भगवान भोंडे, महिला प्रभारी आघाडी भंडारा जिल्हा सुनिताताई टेंभुर्ण, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई उके ,डॉ भैयालाल गजभिये, सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम,अजय रामटेके, महिला साकोली अध्यक्षा तनुजा नागदेवे व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ .रमेश गजबे यांनी सांगितले की , बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा व चळवळ म्हणून चालणारा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे .प्रकाश आंबेडकर हे अतिशय वंचितांना, एससी ,एसटी ,ओबीसी, ना सोबत घेऊन त्यांची हक्काची लढाई लढून ओबीसी आरक्षण असो एस सी, एस टी आरक्षण असो व वंचितांना सत्ता मिळवून देण्याचा भाग असो त्या दृष्टिकोनातून प्रकाश आंबेडकर यांचे प्रयत्न आहेत.
सर्व दीनदलित वंचितांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे .अशा अवस्थेत घटनेची पायमल्ली करणारे पक्षांना सत्तेतून बाहेर फेकले पाहिजे व सर्व वंचित यांनी एकत्र येऊन बाळासाहेबांच्या हात बळकट केले पाहिजे असे मत डॉ रमेश गजबे यांनी वंचित आघाडीच्या जिल्हा मेळाव्यात आपले मत व्यक्त केले. जिल्हा प्रभारी भगवान भोंडे यांनी सांगितले की, जर बाबासाहेबांचा विचार प्रामाणिकपणे आपल्या मनात ठेवून आपल्या पक्षाला चांगलेच फळ देतील बाबासाहेबांच्या सच्चा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता स्वाभीमान असणारा कार्यकर्ता कधी शंभर रुपये व पाचशे रुपयाला विकणार नाही आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही या कडे लक्ष द्यावे.
डॉबाबासाहेब आंबेडकरांनी सुशिक्षित वर सर्व घटकांना जागृत करण्याची ही जबाबदारी ठेवलेली आहे हे जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडत नाही आणि म्हणून आजच्या सर्व सुशिक्षित आणि प्रामाणिक लोकांनी एकत्र येऊन वंचितांना सत्ता मिळवता येईल या दृष्टिकोनातून बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी त्याला भक्कम पाठिंबा द्यावा व तिला वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. असे मत जिल्हा प्रभारी भगवान भोंडे यांनी व्यक्त केले.
तसेच महिला जिल्हा प्रभारी सुनिता टेंभुर्णी यांनीसुद्धा वंचित बहुजन आघाडी च्या महिला आघाड्यांना व महिलांना डॉ बाबासाहेबांच्या आंबेडकरांचे विचार आचरणात आणून एक चळवळ म्हणून एक महिलांनी स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून सर्व महिलांना जागृत करून एकमेकाच्या संपर्कात राहून त्या महिला कशा आपल्या पक्षाला जुळतील या माध्यमातून प्रयत्न वंचित बहुजन आघाडी ला व बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष कुंदाताई उके,साकोली तालुका महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी मार्गदर्शन केले केले.
त्यानंतर तनुजा नागदेवे यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला या प्रबोधनाच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याकरिता त्यांनी संगित्मय गायन केले . तसेच तनुजा नागदेवें यांचा शाल, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तुळशीराम गेडाम यांना भंडारा जिल्ह्याच्या कॅप्टन प्रमुख म्हणून वंचित बहुजन आघाडी साठी प्रमुख पदाची डॉ. रमेश गजबे यांनी सभेत घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते डी .जी. रंगारी यांनी केले.
तर प्रास्ताविक तुळशीराम गेडाम यांनी तर आभारप्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते भीमशंकर गजभिये यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जगदीश रंगारी, भैयालाल गजभिये ,यादोराव गणवीर ,प्रशिक मोटघरे, गीता खंडारे ,सविता जनबंधु, सुनील जीवनतारे, देऊका डोंगरे , संजीव भांबोरे, हरिदास रामटेके ,सुनील शेंडे, प्रकाश रामटेके ,जनार्दन सुखदेवे, जीवन बोधी ,भारत बनसोड ,मोतीलाल वासनिक, अरविंद मेश्राम, शुद्धोधन घरडे ,अमित नागदेवे ,मुकत वंजारी,
नरेंद्र सुखदेवे, अंकुश गोसेवाडे ,उद्धवराव बौद्ध, अभयंकर बोरकर ,उमाकांत रामटेके ,अनिता जांभुळकर ,वर्षा देशब्रातार ,श्रीकृष्ण देशभ्रतार, हरिदास बोरघरे, डॉ सुखदेवे, हरिदास खोबरागडे ,अजय सुखदेवे, ,तुकडु रामटेके ,प्रा भैसारे ,उमाकांत रामटेके ,जगदीश साखरे, जीवनबोधी बौद्ध, तूकडू रामटेके, भारत बनसोड, राजेश येवले ,राजकुमार लोखंडे ,युवराज रामटेके, व इतर भरपूर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वी झाला भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मोहाडी, तुमसर ,भंडारा साकोली, लाखांदूर या सर्व तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत