शिकारीसाठी बिबट्या रोहित्रावर चढला अन् जीव गमावून बसला
शिकारीसाठी बिबट्या रोहित्रावर चढला अन् जीव गमावून बसला
महा घडामोडी न्युज नेटवर्क, सेलू (वर्धा) : तरबेज आणि चपळ शिकारी अशीच बिबट्याची ओळख. पण शिकारीच्या लोभात थेट रोहित्रावर चढलेल्या बिबट्याचा विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील जयपूर येथे घडली असून गुरुवारी क आली. एकूणच शिकारीचा लोभ बिबट्याच्या जिवावर बेतल्याची चर्चा घटनास्थळी होती..
वर्धा जिल्ह्यातील जयपूरची घटना : पंचनामा करून मृतदेहाची विल्हेवाट
जयपूर येथील बोर नदीच्या काठी वन विभागाची जमीन आहे. याच झुडुपी जंगल परिसरात विविध रोपटे लावण्यात आली असून काही ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधी आल्याने यांनी बारकाईने पाहणी केली. दरम्यान पाणी पुरवठ्यासाठी विद्युत जोडणी देण्यात आलेल्या रोहित्रावर बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. माकडाची शिकार करण्याच्या नादात बिबट्या रोहित्रावर चढला असावा आणि त्याला विद्युत प्रवाहाचा झटका बसून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. पंचनामा तसेच शवविच्छेदनाअंती बिबट्याच्या मृतदेहाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत