Breaking News

Nagpur GramPanchayat | नागपूर जिल्ह्यातील पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर, 53 ग्रामपंचायतीतील रिक्त...


मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. 6 जून रोजी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 9 जून 2022 पर्यंत राहील.




महा घडामोडी न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक असलेल्या क्षेत्रात निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

ही आचारसंहिचा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे ९ जून २०२२ पर्यंत लागू राहील. मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही घोषणा आमदार, खासदार, पदाधिकारी यांना आता संबंधित ग्रामपंचायतीत करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. निवडणुका जाहीर होताच उभेच्छुक तयारीला लागले आहेत. रिक्त झालेल्या जागांवर निवडूण येण्यासाठी ते तयारी करत आहेत. उमेदवारांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न उभे राहू इच्छिणारे उमेदवार करत आहेत.


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे. 5 मे 2022 रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करावे. 13 मे ते 20 मे दरम्यान सुटीचे दिवस वगळून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 23 मे रोजी 11 वाजतापासून होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 25 मे रोजी दुपारी 3 वाजतापर्यंत असेल. 


निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ 25 मे दुपारी 3 नंतर असेल. आवश्यक असल्यास मतदान 5 जून रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. 6 जून रोजी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 9 जून 2022 पर्यंत राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत