भीम आर्मी जिल्हास्तरीय कार्यकारणीचा आढावा बैठक संपन्न
शुभम गवई यांची भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्षपदि निवड चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी सुरेंद्र भाऊ रायपुरे व शुभम गवई यांची जिल्हा उप प्रमुख पदी तर प्रशांत भाऊ रामटेके यांची महानगर प्रमुख पदी बिनविरोध निवड.
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,खेमचंद नेरकर,वरोरा : दिनांक 04/05/2022 दिनी चंद्रपूर येथील विश्रामगृह इथे महाराष्ट्र उप प्रमुख प्रशांत भाऊ बनसोड यांच्या अध्यक्षते खाली, शंकर भाऊ मुन महाराष्ट्र महासचिव व अंकुश भाऊ कोचे विदर्भ सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. जिल्ह्याच्या कार्यकारणीचा आढावा घेतल्या नंतर सर्वांच्या सहमतीने व महाराष्ट्र प्रमुख सीताराम भाऊ गंगावणे यांच्या आदेशाने सुरेंद्र भाऊ रायपुरे यांची चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी तर शुभम गवई यांची जिल्हा उप प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. भीम सैनिकांच्या उपस्तिथीत सुरेंद्र भाऊ रायपूरे यांना जिल्ह्याचा पदभार सोपविण्यात आला.
सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी आपले मत मांडताना सांगितले कि मी जरी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त झालो तरी माझ्या सोबत कार्य करणारा प्रत्येक सैनिक हा जिल्हा प्रमुखच आहे, कारण राजा हा ताकतवार तेव्हाच होतो जेव्हा त्याचे सैन्य सोबत असते. सोबतच त्यांनि इशारा दिला कि बहुजन समाज व या समाजाचे आराध्य थोर समाज सुधारक, महामार नाही, आधी प्रेमाने आणि जर ऐकत नसतील तर त्यांना भीम आर्मी च्या भाषेत समजनव यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्याची गय केल्या जाणाविल्या जाईल. चंद्रपूर जिल्यात सर्व सामाजिक संघटनाना एकत्रित बांधण्याचे प्रयोजन करून एक आदर्श घडविण्याच्या त्यांनी भावना व्यक्त केल्या. तर जिल्हा उपप्रमुख शुभम गवई व महानगर प्रमुख प्रशांत भाऊ रामटेके हे सदैव सुरेंद्र भाऊ रायपुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत चळवळ वाढविण्यासाठी प्रतिबंद्द राहण्याची ग्वाही दिली
सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. उज्वल देवगडे, धम्ममित्र विशाखा ताई आमटे, धम्ममित्र उज्वला ताई देवगडे यांनी व रयतवारी च्या संपूर्ण टीम ने घेतलेल्या विशेष परिश्रमाला मानाचा मुजरा करीत उपस्थित असलेले सर्व भीम सैनिक अमर भाऊ रामटेके, कोमल भाऊ रामटेके,संघप्रकाश भाऊ ठमके, ब्रिजेश भाऊ तामगाडे,राहुल भाऊ बांबोळे,राजूभाऊ सोदारी, हिमांशू भाऊ आवळे,भीमराव भाऊ आमटे, बाबुराव भाऊ मानकर ,अतुलभाऊ वनकर,विकास पाटील,अंजली पाटील,पूजा पाटील,संस्कृती मुन, रेखा ताई धोटे,छबीता ताई धोटे,सुनीता ताई जोंधळे,छाया कांबळे,पौर्णिमा ताई रामटेके,उज्वला कांबळे,शमिका पिल्ले, शुभांगी कांबळे,मीनाताई रिंगणे,मंगला गजभिये संतोष जोंधडे,श्रेयस धोटे, उज्वल आमटे,देविदास जोंधडे,याचे आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत