Breaking News

प्रथमताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावर इंजिनीयर यशवंत गणवीर यांची वर्णी लागल्याने प्रतापगड येथे जल्लोष

 

प्रथमताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावर इंजिनीयर यशवंत गणवीर यांची वर्णी लागल्याने प्रतापगड येथे जल्लोष


महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनी-मोर :
मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया दिनांक 10 मे रोजी पार पडली गोंदिया जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच चाबी संघटन व अपक्ष मिळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यात आली 

यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद अर्जुनी-मोर तालुक्यातील गोठणगाव जिल्हापरिषद क्षेत्राचे इंजिनीयर यशवंत सोपान गणवीर प्रतापगड यांना गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मिळाल्याने त्यांचे स्वगाव प्रतापगड येथे त्यांचे आप्तस्वकीय व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तसेच गावातून मिरवणूक काढण्यात आली पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला 

यावेळी नवनियुक्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजिनियर यशवंत सोपान गणवीर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहू तसेच अर्जुनी-मोर तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आदिवासीबहुल व दुर्गम तालुका असून या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्तेत सहभागी सर्व पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तालुक्यासह सर्व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील असे सांगितले त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व राजकीय पक्ष त्यांचा मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत